चिखली (Buldhana):- तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या वतीने चिखली तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
नापिकीचा डोंगर उभा राहिल्याने अंत्यत बिकट परिस्थिती सामना करावा लागत आहे
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आस्मानी सुलतानी संकटामुळे चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांवर सततच्या नापिकीचा डोंगर उभा राहिल्याने अंत्यत बिकट परिस्थिती सामना करावा लागत आहे. त्यामुळे बँकेच्या पिक कर्जाचा रुपयाही शेतकरी भरू शकत नाही सध्या शेतामध्ये उभ्या असलेल्या सोयाबीन तूर उडीद कापूस इत्यादी पिकांचं वन्य प्राण्यांपासून(wild animals) मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याची नुकसान भरपाई देखील त्वरित शासनाने द्यावी. त्याच बरोबर पिक विम्याची रक्कम देखील तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी, काही शेतकऱ्यांनी अशाही परीस्थितीत हात उसने पैसे आणून बॅंकेचा तगादा नको म्हणून कर्ज भरण्याचा प्रयत्न केला आहे.
चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी
अशा सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे,अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून तात्काळ कर्जमाफी द्यावी अशा विविध मागण्यांसह तहसीलदार चिखली यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी माजी आ. तथा शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष सौ. रेखाताई खेडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडेकर, विभागीय महिला अध्यक्ष ज्योतीताई खेडेकर, तालुका अध्यक्ष दिपक म्हस्के, विधानसभा अध्यक्ष ओमप्रकाश भुतेकर , शहर अध्यक्ष रविंद्र तोडकर, जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव काळे, जिल्हा उपाध्यक्ष शंतनू पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील खेडेकर, ज्येष्ठ नेते दिलीप पाटील ,मनोज खेडेकर, अमोल पडघान, बाळासाहेब सावळे , नंदू भाऊ धोंडगे, दत्तू थुट्टे, शिवाजी दांदडे, प्रतापसिंग पवार, प्रविन कांबळे, संजय सावंत, रहिम पठाण, शरद ढोरे, सदाशिव घनघाव, निबांराव देशमुख, सदानंद मोरगंजे, प्रमोद चिंचोले, निखील अंभोरे, महिला तालुकाध्यक्ष छायाताई भोंडे, महाजन ताई, सोळंकी ताई इत्यादी उपस्थित होते.