बुलढाणा (Literature Award) : श्री चक्रधर स्वामी सार्वजनिक वाचनालय शेवाळा ता कळमनुरी जि हिंगोली याद्वारे दिला जाणारा श्री चक्रधर स्वामी उत्कृष्ट मराठी वैचारिक वाड.मय पुरस्कार (Literature Award) रविवार दि 15 सप्टें 2024 रोजी बुलढाणा शहरातील फुले-आंबेडकरी पुरोगामी विचारांच्या साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीत गेल्या 30/35 वर्षांपासून कार्यरत असलेले साहित्यिक तथा अभ्यासक सुरेश देऊबाई प्रल्हाद साबळे (Writer Suresh Sable) यांच्या “परिवर्तनवादी चळवळी :चिंतन आणि प्रबोधन” या ग्रंथासाठी वैचारिक साहित्य प्रकारातील पुरस्कार दिमाखदार सोहळ्यात हॉटेल विसावा पॅलेस, नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात येऊन गौरव करण्यात आला.
शेवाळा ता कळमनुरी येथील श्री चक्रधर स्वामी सार्वजनिक वाचनालय ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून विविध साहित्य प्रकारातील उत्कृष्ट वाद्म:यीन साहित्यकृतीस पुरस्कार गौरव करीत असते.सन 2021-22 आणि 2022-23 या दोन वर्षाच्या साहित्य पुरस्काराचे (Literature Award) वितरण महाराष्ट्रातील विविध प्रकारातील 22 साहित्यकृतीना सन्मानित करण्यात आले.यावेळी बुलढाण्याचे साहित्यिक सुरेश साबळे (Suresh Sable) यांच्या “परिवर्तनवादी चळवळी :चिंतन आणि प्रबोधन” या ग्रंथास राज्यस्तरीय वैचारिक ग्रंथ प्रकारातील प्रतिष्ठेच्या पुरस्काराने प्रख्यात साहित्यिक प्रा. डॉ. देविदास फुलारी यांचे हस्ते व नाटककार तथा उद्योजक बालाजी इबितदार यांचे अध्यक्षतेत सन्मानित करण्यात आले.यावेळी सभास्थानी मिलिंद सोनकांबळे, यशवंत जामोदकर, प्रा डॉ संजय जगताप, गजानन मुधोळ पाटील, अध्यक्ष अनिल कपाटे शेवाळकर आणि देवानंद मुंढे उपस्थित होते.
साहित्यिक सुरेश साबळे (Suresh Sable) यांना यापूर्वी त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन महाराष्ट्र सरकारचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळालेला असून त्यांच्या पुरस्कार प्राप्त याच ग्रंथास यापूर्वी चंद्रपूरचा राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार (Literature Award) आणि मूर्तिजापूरचा सृजनप्रतिभा-2022 या साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
चक्रधर स्वामी अवतार दिन आणि गोविंद प्रभु जयंती निमित्ताने अयोजित ग्रंथपुरस्कार वितरण समारंभासाठी महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक विभागातून पुरस्कृत केलेले (Literature Award) साहित्यिक आणि मान्यवर साहित्यिक अभ्यासक तथा साहित्य रसिकासह इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे, सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव तथा साहित्यिक डॉ. शिवाजी शिंदे, कादंबरीकार डॉ. देविदास तारू, देगलूरचे डॉ. विठ्ठल जांभाळे, प्रा. डॉ. किसन माने सांगोला यासह स्थानिकचे रसिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्वाती कन्हेगांवकर यांनी तर आभार विलास खामणेकर यांनी केले.