अमरावती (Yashomati Thakur) : काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जिद्द चिकाटी आणि मेहनती मुळेच खऱ्या अर्थाने (Congress victory) काँग्रेसचा खासदार निवडून आलेला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी यावेळी केले. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या आभार सभेचे आयोजन काँग्रेस भवन येथे करण्यात आले होते. या सभेत नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला ,यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
आभार सभेत यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन
अमरावती लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे खासदार पदी निवडून आले आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच काँग्रेस भवन येथे निवडणुकीमध्ये ज्यांनी कष्टाने आणि मेहनतीने त्यांना विजयापर्यंत पोहोचविले अशा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्याकरता बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. तसेच खासदार बळवंत वानखडे यांचा सत्कार समारंभ देखील यावेळी पार पडला. या सभेला हरीभाऊ मोहोड,कांचनमाला गावंडे, प्रदिप देशमुख, डॉ. राजिव ठाकूर, सुधाकरराव भारसाकडे,प्रकाशराव काळबांडे,संजय वानखडे,बाळासाहेब हिंगणीकर, भैय्यासाहेब मेटकर, दयाराम काळे, प्रताप अभ्यंकर, सतिष पारधी, अमित गावंडे, श्रीकांत बोंडे, रमेश काळे, प्रमोद दाळु, सहदेव बेलकर, महेंद्र गैलवार,नामदेव तनपुरे,जयंतराव देशमुख, हरीष मोरे, सईद मौलाना, श्रीधर काळे, बब्बूभाई इनामदार, संजय बेलोकार,श्रीकांत झोडपे, किशोर देशमुख, योगेश इसळ, गजानन राठोड, पंकज देशमुख, विरेंद्र जाधव, समाधान दहातोंडे, राहुल येवले, राजु कुऱ्हेकर, दिलीपराव काळबांडे, प्रविण मनोहर, सुरेश आडे, विनोद गुडधे, वसंतराव सोनार, प्रकाश खंडारे, दयाराम पटेल,मुकुंदराव देशमुख, शिवाजी देशमुख,बंडुभाऊ पोहोकार , मिर्झा नाजिम बेग, राजाभाऊ बंड, दिपक ठाकरे, किशोर दाभाडे, विनायक गवई, अशोक वानखडे तथा जिल्हाभरातुन कॉंग्रेस पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
आदींची उपस्थिती होती.
खऱ्या अर्थाने तब्बल 27 वर्षानंतर येथे (Congress victory) काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. बळवंत वानखडे यांची उमेदवारी घोषित झाली त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. याच उत्साहाने प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने आणि मेहनतीने निवडणुकीमध्ये काम केले. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणजेच आज आपल्याला खासदार बळवंत वानखडे यांचा विजय दिसतो आहे. खऱ्या अर्थाने हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे,
– जिल्हाध्यक्ष ,बबलू देशमुख ,जिल्हा काँग्रेस कमिटी