आरोपीना वाचविण्याचा महाविद्यालयीन प्रशासनाचा प्रयत्न
नागपूर (Yashshree Shende Suicide case) : राजनगर येथील नॅशनल फायर सर्व्हिस महाविद्यालयात शिकत असलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांची छळ करण्याची हिंम्मत कशी येते. याला महाविद्यालयाचे प्रशासनच जबाबदार आहे. आरोपीवर दोष सिध्द झाला असून आरोपीवर न्यायालयात खटला सुरु असताना त्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी कसे उभे केले. असा खळबळजनक प्रश्न (Yashshree Shende Suicide case) मृतक यशश्री शेंडेच्या आई वडिलांनी उपस्थित केला असून, यशश्रीच्या सुसाईट नोटमध्ये महाविद्यालयीन प्रशासनाविषयी धक्कादायक माहिती समोर आल्याचे तिच्या आई वडिलांनी म्हटले आहे.
वीरेंद्र सिंग (२३), रा. अल्वर, राजस्थान, अभिषेक कुमार (२३), गया, बिहार, अन्नाग सिंग (२३),रा. लखनौ, उत्तर प्रदेश, हर्ष लोचक (२३), रा. मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश, अनुज सिंग (२३),रा. देवास, मध्य प्रदेश, शशांक शेखर (२३),रा. सारण, बिहार व शशांक पांडे (२३),रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश अशी आरोपी विद्यार्थ्यांची नावे आहेत. २०२० साली राजनगर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज येथे यशश्रीने प्रवेश घेतला होता. नियमांनुसार विद्यार्थी व विद्यार्थिनींना (Yashshree Shende Suicide case) वसतिगृहात राहणे अनिवार्य होते. परराज्यातील काही आरोपी विद्यार्थी तिला विविध कारणांमुळे त्रास देत होते. महाविद्यालयीन प्रशासनाकडे तक्रार करुनही काही कारवाई न झाल्याने आरोपींची हिम्मत वाढली. त्यानंतर आरोपीनी तिच्याशी अश्लील संवाद करणे, अश्लील कृत्य करणे, वसतिगृहातील खोलीत येऊन अत्याचार करण्याची धमकी देणे असे प्रकार सुरू केले. त्यामुळे तिने में २०२२ रोजी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती व वीरेंद्र, अभिषेक तसेच अनुरागविरोधात गुन्हादेखील दाखल केला होता.
आरोपींनी सर्व मुलांसमोर अश्लील कृत्य केले होते. त्यामुळे यशश्री तणावात होती. तिने महाविद्यालयातदेखील तक्रार केली होती. पण महाविद्यालयाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर आरोपींनी प्रवेशद्वाराच्या गार्डरूमसमोरच तिचे नाव लिहीत अश्लील कमेंट्स लिहिल्या होत्या, न्यायालयात सुनावणीदरम्यानदेखील आरोपी तिच्याकडे पाहून घाणेरडे इशारे करायचे. यामुळे कंटाळून अखेर तिने तेथून प्रवेश काढला. दुसर्या महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेऊ लागली. ती प्रचंड तणावात गेली होती. ७ एप्रिल रोजी तिने राहत्या घरी गळफास घेत (Yashshree Shende Suicide case) आत्महत्या केली. तिच्या घरातून सुसाईड नोटमध्ये आरोपींच्या कुकृत्याबाबत लिहिले होते. वडील यशवंत शेंडे यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपींविरोधात बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कॉलेज संचालकावर गुन्हा दाखल का करु नये
महाविद्यालयीन संचालकांनी जर वेळीच दखल घेतली असती तर यशश्रीने आत्महत्या केली नसती. तत्कालीन संचालकांनी हा प्रकार गंभीरतेने घेतलाच नाही. त्यामुळे आरोपींची हिम्मत वाढली. (Yashshree Shende Suicide case) तिच्यासोबत झालेल्या कृत्याला व मृत्यूला कॉलेज प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप यशश्रीची आई सुषमा शेंडे यांनी लावला आहे. माझ्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी,तसेच कालेज संचालकावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. बी. शिंगणे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर भाष्य करता येणार नाही असे म्हटले. तर बजाजनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आरोपींना महाविद्यालयाचे अभय असल्याचा आरोप दरम्यान, आरोपींचे शिक्षण पूर्ण झाले. तीन जणांविरोधात गुन्हा दाखल होता व न्यायालयात खटला सुरू होता. मात्र, असे असतानादेखील महाविद्यालय प्रशासनाने त्यांना प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी करून घेतले व विद्यार्थी सरकारी नोकरीतदेखील लागले. (Yashshree Shende Suicide case) यशश्री ही महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती व तिच्या सुरक्षेची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाचीच होती.