पुसद (Pusad ) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या राज्य मार्गावरील(SH) व प्रमुख जिल्हा मार्गावरील (MDR) खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांकरिता अँड्रॉइड ॲप ” pothole Complaint Redressal System (PCRS) ” तयार करण्यात आले आहे.
तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येते
नागरिकांनी या ॲपचा वापर करून खड्ड्यांविषयक तक्रारी कराव्यात, सदर तक्रारींचे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) कार्यालयाकडून निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती दैनिक देशोन्नती प्रतिनिधीला पुसद सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे उपविभागीय अभियंता (Engineer lighting) प्रकाश झळके यांनी दिली. यामुळे नागरिकांना कार्यालयाचे खेटे मारण्याची गरज पडणार नाही. या ॲपचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा. जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या पोर्टलवर तक्रारी प्राप्त झाल्यामुळे कळेल. व त्या राज्य मार्गावरील व प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे तातडीने बुजवल्या जातील असे यावेळी दैनिक देशोन्नतीशी बोलताना उपअभियत्यांनी सांगितले.