– एकीकडे थकीत वीज बिल धारकांचा वीज पुरवठा तात्काळ कापण्यात येतो
– ग्रामीण भागासह शहरातही अघोषित लोड शेडींग
देशोन्नती वृत्तसंकलन
यवतमाळ (Yavatmal) :- पावसाळ्यात वीजपुरवठा (power supply) सुरळीत राहण्यासाठी मान्सनपूर्व कामे करणे गरजचे आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून अद्यापही मान्सूनपूर्व कामांना अद्यापही सुरुवात झाली नाही. या कामांच्या अभावी वीजेचा लपंडाव (Concealment of electricity ) सुरु आहे. ग्रामीण भागासारखी आता शहरातही अघोषित लोड शेडींग (Unannounced load shedding) वाढल्यामुळे वितरणच्या ढिसाळ कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहे. यंदा योग्य वेळेत कामे न झाल्यास याचा नाहक त्रास जिल्हावासीयांना सहन करावा लागणार आहे. मे महिन्यातील कडक उन्हात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहक हैराण झाले आहे. काही वेळेला वादळवाऱ्यात दक्षता म्हणून वीज बंद केली जाते. परंतु, वीज वितरण कार्यालयाचा ( Electricity Distribution Office ) नेहमीच ठिसाळ कारभार दिसून येतो. यंत्रणेच्या कमकुवतपणामुळे नागरिकांना नेहमी अंधारात बसावे लागत आहे. वीज बिल भरणाबाबत महावितरणकडून मोहीम राबविण्यात येत आहे. वीज संदर्भात दर वाढ होऊनही बहुतांश ग्राहक नियमित बिल भरत आहे. असे असताना वीज पुरवठ्यासंदर्भात सुविधा पुरवणे अपेक्षित आहे. मात्र त्याही ग्राहकांना अलीकडे ‘बत्ती गुल च्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे थकीत वीज बिल धारकांचा वीज पुरवठा तात्काळ कापण्यात येतो. दुसरीकडे मात्र नियमित बिल भरणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे
– वीज यंत्रणेच्या पावसाळा पूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे फक्त कागदावरच
एकूणच सुविधांची निखळ बोंबाबोंब अशी परिस्थिती दिसून येत आहे. शहर व ग्रामीण भागातील वीज यंत्रणेच्या पावसाळा पूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे फक्त कागदावरच आहेत की काय अशी चर्चा ग्राहकांमध्ये रंगत आहे. आज घडीला दिवसा दोन तास तर रात्री दोन तास वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा नाहक त्रास मात्र वीज ग्राहकांना होत आहे. असेच काहीसे चित्र ग्रामीण भागात नेहमी दिसून येते, मात्र आता यवतमाळ शहराची ( Yavatmal city ) परिस्थितीसुद्धा ग्रामीण भागासारखी झाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी शहरातील काही भागात वीज यंत्रणेवर ओव्हरलोड (Overload on the system) वाढल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. विजेच्या संदर्भात महावितरणकडून योग्य ती कामे सुरु आहे. दीपक देवहाते, प्रभारी अधीक्षक अभियंता जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व कामांची आढावा बैठक घेतली. यामध्ये विशेषतः महावितरण विभागाला (Mahadistribution Department) दिशानिर्देश दिले होते. याला मात्र महावितरणने गांभीर्याने नघेतल्याचे दिसून येत आहे एकूणच आता यासंदर्भात नेमकी काय पावले उचलली जातात याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
– ‘बत्ती गुल’ मुळे जिल्हावासीयांना वैताग
नागरिकांची मध्यरात्री महावितरण कार्यालयात ( Mahadistribution office ) धाव गेल्या आठवड्यपासून शहरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा त्रास शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. अशातच मंगळवारी रात्री उशिरा वडगाव भागात (Vadgaon area ) बराच वेळ वीज पुरवठा बंद होता. अशातच संतप्त झालेल्या दीडशे ते दोनशे कार्यालयात धाव घेतली. दरम्यान जबाबदार नागरिकांनी महावितरण अधीकाऱ्यांना जाब विचारला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती.