चालु वर्षातील चार महिन्यात १०९ जणांनी जिवन संपविले आत्महत्या रोखण्यात शासन/प्रशासन सपशेल अपयशी
यवतमाळ (Yavatmal) शासनाच्या शेतीविषयक (Agriculture of Govt) चुकीच्या धोरणामुळे मागील तेवीस वर्षांपासून शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासन शेतकरी अनुकूल धोरण तयार करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखतील या आशेवर वर्षामागून वर्ष निघून गेली मात्र शेतकरी आत्महत्यांचे सत्र आजतागायत सुरु असून जिल्ह्यात तेवीस वर्ष (Twenty-three years) चार महिन्यात (four months) ५ हजार ९४७ शेतकऱ्यांनी विष प्राशन करून, फासावर लटकून, विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा केवळ शेतकरी आत्महत्यामधील अनुदानासाठी पात्र व अपात्र आत्महत्यांचे वर्गीकरण करण्यात व्यस्त आहेत. जगाचा पोशिंदा म्हणविणाऱ्या शेतकऱ्यांच्या तेवीस वर्ष चार महिन्यात केलेल्या आत्महत्या शासन व प्रशासनासाठी रुटीन विषय झाला असला तरी शासनाच्या धोरणांमुळे (Due to government policies)झालेल्या नुकसानीच्या शेतीमुळे आपला आत्महत्याग्रस्त कुटूंबाने कुटूंबप्रमुख, आपला मुलगा गमावलेला आहे. तेवीस वर्ष चार महिन्यात झालेल्या शेतकरी आत्महत्यांचा महिना निहाय गोषवारा घेतल्यास,
जानेवारी महिन्यात ४१५, फेब्रुवारी महिन्यात ४५२, मार्च महिन्यात ४७०, एप्रिल महिन्यात ४०८, मे महिन्यात ४१३, जुन महिन्यात ४२२, जुलै महिन्यात ४५५, ऑगस्ट महिन्यात ६२८, सप्टेंबर महिन्यात ६४३, ऑक्टोबर महिन्यात ५७४, नोव्हेंबर महिन्यात ५५३ तर डिसेंबर महिन्यात ५१४ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला. यात शासकीय अनुदानासाठी २ हजार ४२७ कुटूंब पात्र ठरले तर ३ हजार४३८ कुटूंब हे सानुग्रह अनुदानासाठी अपात्र ठरले असून चालु वर्षातील ८२ प्रकरणे चौकशी करिता प्रलंबीत आहेत.
वर्ष २०२२ मध्ये जिल्ह्यात २९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या,
पैकी सानुग्रह अनुदानासाठी १६१ पात्र तर १३० अपात्र ठरल्या, २०२३ मध्ये ३०२ शेतकरी आत्महत्या झाल्या असून त्यात १८१ पात्र तर १२१ अनुदानासाठी अपात्र ठरल्या. तर वर्ष २०२४ मध्ये १०९ आत्महत्या झाल्या असून यात जानेवारी
महिन्यात २०, फेब्रुवारी महिन्यात ३५, मार्च महिन्यात ३२ तर एप्रिल महिन्यात २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.