- दोन युवकांमध्ये समझोता झाला. व्यावसायिक धंडदांडगा असल्याने वाढीव खंडणीची मागणी केली
यवतमाळ (Yavatmal ) : शहरातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा ( famous businessman) दोन युवकांनी एका विशिष्ट कृत्याचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ दाखवून व्यावसायिकाला खंडणीची मागणी केली, प्रसिध्द व्यावसायिकाने घडलेला घटनाक्रम पोलिसांपुढे वेगळ्या पद्धतीने मांडला. खंडणी मागणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठाण्यात आणले. ( police station ) त्यांच्यावर बाजीराव भिरकावून मोबाईलमधून व्हिडीओ डिलिट करून धमकावले त्यामोबदल्यात मोठ्या आकड्याची पेटी पोलिसांनी घेऊन व्यावसायिकाची घरवापसी केली. हा धक्कादायक प्रकार यवतमाळ शहरातील एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला.एका प्रतिष्ठित व्यावसायिकाची नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका युवकाशी केवळ तोंड ओळख झाली. तो व्यावसायिक एका विशिष्ट वर्गातील असल्याने त्याने युवकाशी मैत्री केली. विशेष म्हणजेत्या व्यावसायिकाची कुंडलीच त्या युवकाला ज्ञात होती. गेल्या पंधरवड्यात त्या व्यावसायिकाच्या एका कृत्याचा व्हिडीओ परिचित युवकाच्या मित्राने काढला. तेथून दोन दिवसानंतर दोन्ही युवकांनी मिळून त्याला व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. पैश्याच्या मोहापोटी त्या पैकीच एकाने पाच लाख रुपये मागितले. हि बाब दुसऱ्या युवकाला कळाली. त्यानंतर त्या दोन युवकांमध्ये समझोता झाला. व्यावसायिक धंडदांडगा असल्याने वाढीव खंडणीची मागणी केली.
◆ डीबी पथकाचा प्रतापः दहा पेटीत केले प्रकरण सेटल
पैश्याचा आकडा एका मर्यादेपलीकडे गेल्यानंतर या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग व्यवासायिकाला दिसेनासा झाला होता. व्यावसायिकाने नवीन शक्कल लढवीत आठवडाभरापूर्वी शहरातील एका पोलीस ठाण्यात ( police station ) धाव घेतली. घडलेला किस्सा तेथील जबाबदार पथकातील लोकांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने कथन केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या दोन युवकांना पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान तोव्यावसायिकही ठाण्यात हजर होता. दोघांनाही बाजीरावचा प्रसाद दिला त्यावेळी खराखुरा प्रकार प्रकाशझोतात आला. किस्सा ऐकून पोलिसांनाही धक्काच बसला. बदनामीची भीती त्या व्यावसायिकापुढे होती. याचाच फायदा पोलिसांना झाला. त्यानंतर एका मोठ्या आकड्याची रक्कम त्या व्यावसायिकाने पोलिसांना प्रकरण रफादफा करण्यासाठी दिली. त्यानंतर पोलिसांनी गरम ताव्यावर आपल्या पोळ्या शेकून घेतल्या अन त्या युवकांना धमकावून सोडून दिले तसेच त्या व्यासायिकानेही आपल्या घराचा रस्ता पकडला उल्लेखनीय असे कि, आपल्या तक्रारीच्या निवारणासाठी सामान्य नागरिक पोलीस ठाण्याची पायरी चढतात अन त्याही तक्रारदारासोबत अश्या प्रकारचे कृत्य होत असेल तर याला नेमके काय म्हणावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे या प्रकाराची जोरदार चर्चा वर्तुळात रंगत आहे.