दारव्हा/यवतमाळ (Yavatmal Hospital) : तालुक्यातील बोरीअरब येथील राजीव नगर जवळील पल्लवी हॉटेल जवळ उभ्या असलेल्या (Yavatmal Accident) ट्रकला दुचाकी स्वाराने जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्यावर( Yavatmal Hospital) यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना रात्री ९. १५ मिनिटांनी घडली.
माहितीनुसार, मुर्तीजापुर तालुक्यातील कंजारा येथील रहिवासी संदेश सुभाषराव कडू (३७) हे यवतमाळ येथे इंदूजा (milk collection center) दूध संकलन केंद्र येथे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. मुलीचा वाढदिवस असल्याने ते यवतमाळ येथून कंजाऱ्याकडे त्यांची दुचाकीने जात असताना बोरी अरब येथील राजीव नगर जवळील पल्लवी हॉटेल समोर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची (Yavatmal Accident) जबर धडक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. बोरी अरब येथील रुग्णसेवक गिरीजानंद कळंबे यांनी व सहकारी अवीनाश क्षीरसागर,अमोल भगत राजीवनगर यांनी तात्काळ रुग्णवाहिकामध्ये टाकून जखमी दुचाकी चालकाला यवतमाळ येथील (Yavatmal Hospital) शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान दुचाकी चालक संदेश कडू यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, भाऊ, आई, वडील असा आप्तपरिवार आहे.