यवतमाळ (Yavatmal Police) : धावत्या बसमधून चार चोरट्या महिलांनी प्रवासी महिलेचे लाखोंच्या किमतीचे महागडे घड्याळ उडविल्याची घटना (Yavatmal Police) यवतमाळच्या लालखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर लाडखेड पोलिसांनी बस गाठून चोरट्या महिलांची टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून (Yavatmal Police) पोलिसांनी सोन्याचे घड्याळ जप्त केले आहे. त्यांच्याकडून अनेक (theft incident) चोरीच्या घटना उघडकीस येतील असा पोलिसांना संशय आहे. या महिला टोळीकडून पोलिसांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीचे एक सोन्याचे लिमिटेड एडिशन घड्याळ जब्त केले आहे.
यवतमाळच्या लालखेड पोलिसांची कारवाई
दिग्रस वरून एक महिला यवतमाळ (Yavatmal crime) येथे येण्यासाठी एसटीत बसल्या. नेमके हेच हेरून एसटीत चार महिलांनी तिच्याभोवती घेराव करून त्यांच्या पर्समधील सोन्याचे घड्याळ मारले.रस्त्यात प्रवास दरम्यान प्रवासी महिलेने तहान लागल्याने पाण्याची बाटली काढण्यासाठी पर्स उघडली. तेंव्हा घड्याळ ठेवलेली छोटी पर्स त्यांना लंपास झाल्याचे त्यांना लक्षात आले. ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केली. संशयाची सुई सर्व प्रवास्यांकडे फिरत होती.बस चालकाने सरळ गाडी (Yavatmal Police) लालखेड पोलीस ठाण्याजवळ थांबविली.पोलिसांनी प्रत्येक प्रवाश्यांची चौकशी केली. संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या चार महिलांना लाडखेड पोलीसांनी ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. झडतीदरम्यान त्यांच्याकडून साडेतीन लाखांचे महागडे घड्याळ जप्त करण्यात आले. यामधील दोन महिलांवर (Yavatmal Police) यवतमाळ पोलिसांत चोरीचे गुन्हे दाखल आहे. ही (Yavatmal crime) कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड,अप्प्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,एसडीपीओ चिलुमूला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विशाल हिवरकर यांच्या नेतृत्वात प्रेम राठोड, उमेश चंदन, नितीन सलाम, उमेश शर्मा, विठठल कोपनर, शुभांगी ठाकरे, पुजा ठाकरे, आतिष कोकाटे, जयंत शेन्डे यांनी केली.
जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची होणार उकल
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार महिलांपैकी काही महिलांविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातील पोलिसांत गुन्हे दाखल आहे. नव्हेतर त्यांना अनेकदा अटकही करण्यात आली आहे.मात्र यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या काही घटनांमध्ये कुठल्याही प्रकारचा क्ल्यू लागत नव्हता. आता मात्र त्यांच्याकडून जिल्ह्यातील अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने (Yavatmal Police) लालखेड पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे.
बसमध्ये चढल्या होत्या पाच महिला
ज्या बसमध्ये चोरीची घटना घडली. त्या बसमध्ये चोरीच्या घटनेपूर्वी चार नव्हेतर पाच महिला चढल्या होत्या.घड्याळ उडविल्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ बसमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला.मात्र बसमध्ये गर्दी असल्याने ते शक्य झाले नाही. यापैकीच ऐकीने मात्र कसाबसा एका स्थानकावर पळ काढला.चौघींच्या अटकेनंतर आता त्याही पळ काढलेल्या महिलेचे नाव पोलिसांच्या तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. लालखेडच्या ठाणेदारांनी आपल्या अधिनस्त पोलीस यंत्रणेला त्या महिलेच्या अटकेचे आदेश दिले आहे. रात्री उशिरापर्यंत तीही (Yavatmal Police) महिला पोलिसांच्या गजाआड येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.