फेब्रुवारी महिन्यात होणार करार समाप्त..!
यवतमाळ (Yavatmal) : मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील हजारो युवकांना सहा महिन्यांकरिता रोजगार उपलब्ध करून दिला. आता या योजनेचा कार्यकाळ संपत आहे. परंतु या लाडक्या भावांचे पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला असून या सुशिक्षित युवकांवर पुन्हा बेरोजगारीची (Unemployment) टांगती तलवार लटकते आहे. त्याशिवाय आता गाईडलाईन्सनुसार नव्या युवकांसाठी संधीचे संकेतही दिसून येत आहे.
गाईडलाईन्सनुसार नव्या युवकांना संधीचे संकेत..!
तत्कालीन मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी बेरोजगार युवकांच्या हाती काम देण्यासाठी लाडका भाऊ योजना आणली होती. या योजनेअंतर्गत युवकांना सहा महिन्यांकरिता विविध सरकारी कार्यालय व खासगी आस्थापनात काम देण्यात आले होते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 3 हजारांपेक्षा जास्त युवकाची निवड करण्यात आली. 6 ते 10 हजार रुपये या अल्प मानधनावर त्यांना कामही देण्यात आले. परंतु या सहा महिन्यांच्या काळात काही लोकांचे वेतन झाले तर काहींना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. आज ना उद्या देईल अशी आशा उराशी बाळगून असतानाच, सहा महिन्यानंतर पुढे काय असा प्रश्न उभा ठाकला आहे. अशातच या युवकाचा आता कार्यकाळ संपत चाललेला आहेया योजनेअंतर्गत शासकीय (Government), तसेच खासगी आस्थापनात रिक्त असलेल्या जागांसाठी शिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यात आले. यात काहींना शासकीय विभागात तर काहींना खासगी आस्थापनांत (Private Establishment) काम मिळाले. आता या महिन्यात योजनेचा कार्यकाळ संपत आहे. परंतु या लाडक्या भावांचे पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला असून, या सुशिक्षित युवकांवर (Educated Youth) पुन्हा बेरोजगारीची टांगती तलवार लटकते आहे. विशेष म्हणजे या शासकीय योजनेचा एका व्यक्तीला एकदाच लाभ घेता येते त्यानंतर नवीन उमेदवाराला संधी देण्यात येते. आता प्रशिक्षण पूर्ण झालेल्या युवकांसाठी नेमके काय पावले असणार हेही पाहणे महत्वाचे झाले आहे.
हजेरीत त्रुट्या विलंब वाढला…
आस्थापनांकडून प्राप्त हजेरीवरून मानधन अदा केले जाते. मात्र यात बऱ्याच आस्थापनांकडून हजेरी नोंदीत त्रुटी आढळून आल्याने त्या दुरुस्तीसाठी वेळ जातो आहे. शिवाय काहींचे बँकेत केवायसी अपडेट (KYC Update Bank) नसल्याने तर काहींचे आधार लिंक नसल्याने मानधन देण्यास दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवीन जीआरला दुजोरा…
या संदर्भात वरिष्ठ स्तरावर रफ ड्राफ्टिंग सुरू आहे. आयुक्त, सहायक आयुक्त (Assistant Commissioner) यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले असून लवकरच या संदर्भात नवीन जीआर निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या संदर्भात अधीकृत माहिती अद्याप नसल्याचे सांगण्यात आले.
अनेकांचे रखडले मानधन…
सहा महिन्यांपूर्वी रोजगार (Employment) मिळालेल्या बेरोजगारांपैकी बऱ्याच सुशिक्षित बेरोजगारांचे मानधन गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले आहे. यात आस्थापनांनी हजेरीची नोंद करताना चुका केल्याने हे मानधन रखडल्याचे सांगण्यात आले आहे. तर काहींची बँक केवायसी झाली नसल्याने हे मानधन झाले नसल्याचे सागंण्यात आले आहे.