महिला बँकेचा 242 कोटींचा कर्जघोटाळा
यवतमाळ (Yavatmal) : स्थानिक बाबाजी दाते महिला बँकेच्या 242 कोटींच्या कर्ज घोटाळ्यात आता अटकपूर्वसह अंतरीम जामिनासाठी सुमारे 78 आरोपींनी अर्ज केले होते. त्यातील 40 वर आरोपींना स्थानिक न्यायालयाने (Local Court) दिलासा दिला. आता त्यांचा जामिन रद्द (Bail Cancelled) करण्यासाठी येथील एसआयटीने हालचाली चालविल्या आहेत. आगाती तीन ते चार दिवसांत त्या सर्व जामिनांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात (Bombay High Court Nagpur Bench) आव्हान दिले जाणार आहे.
स्थानिक बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत (Mahila Cooperative Bank) सुमारे 242 कोटींचा कर्ज घोटाळा झाला. त्यामध्ये प्रमुख 23 आरोपीसह एकूण 206 जणांवर येथील अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. एसआयटीने हा तपास हातात घेतल्यापासून आत्तापर्यंत या घोटाळ्यात 13 आरोपींना बेड्या (Accused in Chains) ठोकल्या आहेत. त्यातील दोघांचा झालेला जामिन एसआयटीने उच्च न्यायालयात (High Court) आव्हान देत रद्दही केला आहे. त्यानंतर सुमारे 40 वर आरोपींना स्थानिक न्यायालयाने दिलासा देत त्यांचा जामिन मंजूर केला. आता त्या सर्वांचाच जामिन रद्द व्हावा, यासाठी एसआयटीचे (SIT) प्रमुख तथा दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनिकांत (Sub Divisional Police Officer Chilumula Rajinikanth) यांच्या नेतृत्वातील पथकाने हालचाली चालविल्या आहेत.
अनेकांच्या अडचणीत वाढ
येत्या तीन ते चार दिवसांत दस्तऐवज पूर्ण करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात (Nagpur Khandpith) ते या जामिनांना आव्हान देणार आहेत. त्यामुळे या घोटाळ्यातील जामिन मिळालेल्या आरोपींच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.