देशोन्नती वुत्तसंकलन
आर्णी(Arni):- उन्हाचा पारा चाळीसी पार करीत असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. जणू काही सुर्य आग ओकत असल्याचे जाणवत असताना काल सकाळी ११ वाजता दरम्यान आर्णी शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Central Cooperative Bank) समोर एका उभ्या असलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला होता. पाहता पाहता घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. काही प्रमाणात भितीचे वातावरण तयार झाले होते. लगेचच घटना स्थळी जमलेल्या आर्णी युवा मंचच्या (Youth Forum) सदस्यांनी आग (fire) विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत दुचाकी जळाली मात्र कोणतीही जीवीतहानी टळली. आर्णी युवा मंचाच्या सदस्यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने त्यांचे कौतुक होत आहे.