पुसद (Yawatmal):- पुसद विधानसभा मतदारसंघ(Assembly Constituency) -81 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. त्यासंदर्भात मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, पथनाट्य, वृत्तपत्रातून मतदान जनजागृती संदर्भात माहिती देण्यात यावी असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या मतदान जनजागृती विषयाचे ऑब्झर्वर अत्यंत कुमार यांनी 31 ऑक्टोबर रोजी आयोजित उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात उपस्थित नोडल अधिकाऱ्यांना केले.
विधानसभा निवडणुकीमध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार
पुसद विधानसभा मतदारसंघ -81 चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्या मार्गदर्शनात सदर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ऑब्जर्वस सत्येंद्र कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार इंगोले, निवासी नायब तहसीलदार गजानन कदम, नायब तहसीलदार सीडी राठोड, मयूर राऊत तहसीलदार दिग्रस, डी एम वाघ राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पुसद डिव्हिजन, ए एन पिकले दुय्यम सहाय्यक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग पुसद, प्रमोद इंगळे प्रतिनिधी तालुका कृषी कार्यालय पुसद, धीरज आडे, स्वाती वाढ, अमित बोजेवार, प्रा.रवी चापके,प्रा. डॉ. सरिता चंदनकर, प्रा. डॉ. शितल देवसरकर, सागर भंडारे, गौरव कुमार कांबळे, यांच्यासह निवडणूक विभागाची लिपिक देवानंद राठोड, सत्यम राठोड, नोडल विभागाचे अधिकारी दिलीप कोल्हेवाड व त्यांचे सहकारी इत्यादी उपस्थित होते.