यवतमाळ (Yawatmal) :- उमरखेड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शेती भागांमध्ये अवैध धंदयाचे जुगार, मटक्यांसह अवैध धंद्यांचे पिक जोर धरून आहे. पोलीसांना त्यांचा वाटा मिळत असल्याने, अवैध धंदयांवरील कारवाया नावालाच शिल्लक असून हरदडा, कारखेडा सारख्या ग्रामीण भागांमध्ये जुगार, मटका खुलेआम सुरु असून अवैध व्यवसायीकांवर पोलीस प्रशासनाचा अंकूश राहिलेला नाही. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनपासून (Police Station) हाके अंतरांवर असलेल्या भागामध्ये जुगार व मटक्याचा क्लब सुरु असल्याने स्थानिकांमधून ही आश्चर्य व्यक्त होत आहे.
जुगार अड्डा पोलीसांच्या नाकावर टिच्चून बिनदिक्कतपणे सुरु असून दररोज लाखोंची उलाढाल सुरु
उमरखेड तालुक्यातील राजकीय वर्चस्व असलेल्या एका ‘सोज्वळ दिसणार्या ’ वजनदार नेत्याच्या पाठिंब्याने ‘नितीन’चे अवैध धंदे (Illegal business) जोमात आले आहे. राजकीय हात पाठीशी असल्याने नितीन ने त्याचा चांगलाच फायदा घेतला असून त्याच्या क्लब कडे पोलीस नजर उचलून पाहायलाही तयार नाही,कुणी माहिती दिली तरी आपण त्या गावाचे नसल्याचा आव पोलीसांकडून आणल्या जात आहे. त्यामुळे तालुक्यात अवैध धंदयांमध्ये नितीनचा चांगलाच बोलबाला आहे. मध्यंतरी नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे क्लब चालविणार्या ‘सिध्दू’च्या तेथील पोलिस अधिक्षकांनी मुसक्या आवळल्या, त्यानंतर सिध्दूने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडची सिमा गाठून अवैध धंदयासाठी सरळ शेती भागांची निवड केली व बेचखेड पांदण रस्त्यावरील ‘राजू’ला भागीदार घेऊन त्याच्याच शेतात जुगार अड्डा मांडला. बाहेर जिल्ह्यातील ‘सिध्दू’ ने उमरखेड तालुक्यात स्थिरावण्यासाठी आपल्या धंद्यात नितीन ची एंट्री करवून स्वत:साठी राजकीय अभय मिळून घेतले. त्यामुळे मागील सात महिन्यांपासून हा जुगार अड्डा पोलीसांच्या नाकावर टिच्चून बिनदिक्कतपणे सुरु असून दररोज लाखोंची उलाढाल सुरु आहे.
सुरक्षित जुगार अड्डा असल्याने कळमनुरी, हिमायतनगर, हदगाव, ढाणकी व इतर भागात जुगारी अड्डावर लाखोंचे डाव रंगवित आहे. उमरखेड मधील राजकीय अभय घेऊन नितीन आणि सिध्दू करोडीची माया जमा करीत असून काळया धंदयातील पैसा नव्या व्यवसायातही गुंतवित आहे. राजकीय पाठबळामुळे नितिन व सिध्दू चा उमरखेडच्या अवैध धंदयांमध्ये डंका असून उमरखेडचे गुन्हेगारीकरण झाल्यास, त्यास ‘तो’ राजकीय नेताच जबाबदार असेल,अशी ओरडही आता स्थानिकांमधून होत आहे.
खर्या जुगार्यांना सोडून पोलीसांची कारवाई भलत्यांवरच
आठ दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने बेलखेड पांदण रस्त्यावरील तिघांच्या भागीदारीने सुरु असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकली. त्यावेळी तेथे लाखोंचा जुगार सुरु होता, चार डझन जुगारी पोलीसांच्या हातीही लागले,ऐवढेच नव्हे तर लाखोंच्या रोखी सह मुद्देमालही पोलीसांच्या हाती लागला.मात्र राजकीय ‘वरदहस्त’च्या माध्यमातून खात्यातूनच ‘फोनोप्रâेंड’ चा वापर झाला आणि त्यानंतर पोलीसांनी नाममात्र कारवाई दाखवून जुगार अड्यावरील चार नोकरांना जुगारी म्हणून दाखवून कारवाईचे सोपस्कार आटोपल्याची चर्चाही आहे.