बुलढाणा जिल्हा योगासन स्पर्धेचे थाटात उद्घाटन
बुलढाणा (Yogasana Competition) : योग ही आपली अतिप्राचीन संस्कृती आहे. योगा म्हणजे कुठल्याही रोगाला आपल्या शरीरात प्रवेश न करून देणे. योगामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. योगा आता आंतरराष्ट्रीय खेळ झाला आहे. (Yogasana Competition) योगासाठी बुलढाणा शहरात एक कोटी रुपयाची सुसज्ज इमारत बांधून तयार आहे. लवकरच तेथे योगाच्या ऍक्टिव्हिटी सुरू होणार आहेत. हुतात्मा गोरे स्मारक परिसरात एक योगा हॉल बांधून तयार आहे. या सुविधांचा लाभ घेऊन बुलढाणेकरांनी आपले आरोग्य सुदृढ करावे, अशी आवाहन आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी करून भविष्यात योगाच्या राष्ट्रीय व राज्य स्पर्धा बुलढाण्यात घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बुलढाणा जिल्हा योगासन स्पर्धा (Yogasana Competition) आज रविवार 28 जुलै रोजी “मयूरकुंज” सभागृहात आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेचे उद्घाटन आ. संजय गायकवाड यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना आ. गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले की, बुलढाणा शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून सातत्याने बुलढाणा शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. आयुष्यात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच जाणीवेणे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाच्या सुविधा सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. बुलढाणा शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे, यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शशिकांत बाबर, योगा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम उपरवट डॉ. गजेंद्र निकम यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. वैशाली निकम यांनी स्पर्धेच्या आयोजनामाची भूमिका स्पष्ट केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षितीज निकम याने केले. संतुलन योगा केंद्र या ठिकाणी आयोजित योगासन स्पर्धेत विविध वयोगटातील महिला व पुरुष संघांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून (Sanjay Gaikwad) आ. गायकवाड यांनी जिल्हास्तरीय योगा स्पर्धेची (Yogasana Competition) उद्घाटन केले. याप्रसंगी संतुलन योगा केंद्राच्या बाल योगिनी योग नृत्य सादर केले व क्षितिज निकम यांनी आर्टिस्टिक परफॉर्मन्स सादर करून दाद मिळवली. अयांश शेवाळे याने योगागीत सादर केले. या स्पर्धेसाठी डॉ. पुरुषोत्तम उपरवट, विलास इंगळे, डॉ.वैशाली निकम, पूजा गायकी, निलेश शिंगणे, तृप्ती काटेकर, प्रेमदास वाकोडे यांनी पंच म्हणून काम केले.