India vs Bangladesh:- भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नई (Chennai)येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय नोंदवला आणि मालिकेत आघाडी घेतली. पुढचा सामना कानपूरला होणार आहे. टीम इंडियाला हा विजय मिळवून क्लीन स्वीप करायचा आहे.
टीम इंडियाला हा विजय मिळवून क्लीन स्वीप करायचा आहे
दुसऱ्या कसोटीसाठी अपरिवर्तित भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सर्फराज खानचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, चेन्नई कसोटीसाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing XI) स्थान देण्यात आले नव्हते. कानपूर येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही त्याचा समावेश होणार नाही. केएल राहुलला (K.l Rahul) पुन्हा एकदा संघात संधी दिली जाऊ शकते. केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली तर सर्फराज खानला खेळण्याची संधी मिळणार नाही. या स्थितीत सर्फराज खानला संघातून वगळले जाऊ शकते. बीसीसीआय (BCCI)सर्फराज खानला इराणी ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी सोडू शकते. अशा परिस्थितीत तो यावेळीही कसोटी सामना खेळू शकणार नाही. मात्र, सर्फराज खानला सोडायचे की संघात ठेवायचे, याचा निर्णय सामन्याच्या एक दिवस आधी होणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संघातील कोणत्याही खेळाडूला दुखापत किंवा अन्य समस्या न आल्यास सरफराजला सोडण्यात येऊ शकते.
टीम इंडियाच्या खेळाडूंना कोणतीही अडचण येत नसेल, तर सर्फराजला ठेवण्यात काही अर्थ नाही
टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचेही मत आहे की, जर टीम इंडियाच्या खेळाडूंना कोणतीही अडचण येत नसेल, तर सर्फराजला ठेवण्यात काही अर्थ नाही. त्याला इराणी ट्रॉफीसाठी संघातून सोडण्यात यावे. कानपूर आणि लखनौ फार दूर नाहीत त्यामुळे सर्फराज तेथून लखनौला जाऊ शकतो. विशेष म्हणजे कानपूर कसोटी संघाची घोषणा झाली. तेव्हा सर्फराज खानला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. केएल राहुलला पुन्हा एकदा खेळण्याची संधी दिली जाईल. त्यांच्यासाठी हा शेवटचा अस्वार असू शकतो.