गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथील घटना
घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
गंगाखेड (Young Committed Suicide) : रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील झाडाला बेल्टने गळफास घेऊन एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मरगळवाडी शिवारात घडली. याप्रकरणी (Young Committed Suicide) पोलीस पाटलाने दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. नातेवाईकांनी मात्र घातपात झाल्याचा आरोप केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या मरगळवाडी शिवारात रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील झाडाला तुळशीराम नामदेव देवकते वय २४ वर्ष रा. शंकरवाडी याने कंबरेच्या बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. नातेवाईकांसह पोलीस व गावातील ग्रामस्थांनी त्याचा गळफास काढून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.
याप्रकरणी मरगळवाडी येथील पोलीस पाटील धनराज विक्रम उफाडे यांनी दिलेल्या खबरीवरून बुधवार ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:४५ वाजेच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. (Young Committed Suicide) मात्र मयत तुळशीराम देवकते याने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी मयताच्या सासरवाडीतील संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांनी मयताची पत्नी व सासरच्या मंडळीला काही काळ पोलीस ठाण्यात बसवून ठेवत सोडून दिल्याने नातेवाईकांचा रोष वाढला व संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत शवविच्छेदन करायचे नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने गुरुवार ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. (Young Committed Suicide) नातेवाईकांनी केलेल्या आरोपामुळे उपजिल्हा रुग्णालय व पोलीस ठाणे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.


