नागभीड (farmer suicide) : तालुक्यातील कोटगाव येथे एका तरूण शेतकर्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या (farmer suicide) केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. राजेंद्र अरुण काटेखाये (३०) रा. कोटगाव असे आत्महत्या करणार्या शेतकर्याचे नाव आहे. सततच्या नापिकीमुळे या शेतकर्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. या कर्जाला कंटाळून बुधवारी किटकनाषक प्राशन करून केले.
राजेंद्रने किटकनाशक प्याल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी लगेचच ग्रामीण रूग्णालय नागभीड दाखल केले. प्रकृती चिंत्ताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला ब्रम्हपूरी येथे हलविण्यात आले. मात्र उपचार दरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. सदर शेतकर्याने काही दिवसांपूर्वी सुद्धा किटकनाशक प्राशन करून (farmer suicide) आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती आहे.