गडचिरोली(Gadchiroli):- सविस्तर वृत्त कुरखेडा तालुक्यातील सावरगाव येथे नवयुवक शेतकरी (farmer)करन संजय उईके वय 22वर्षे आज शेतात रोवणीचे काम करीत असताना विषारी साप(snake) चावल्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना सकाळी घडली.
उपचार सुरू करण्याअगोदरच त्याचा मृत्यू
करण मुळ भरनोली (बोरटोला) या गावचा रहिवासी असुन तो आपल्या मावशी कडे रोवणी निमित्त सावरगाव ईथे आला होता. सर्प दंश झाल्याचे कळताच रुग्णालयात(Hospital) नेण्यास १०८ क्रमांक ला फोन करुन सती नदी च्या रपटा खचल्याने रुग्णवाहिका (ambulance)उशीरा येईल असे कळविण्यात आले. त्यामुळे खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात उपचार करीता व्हाया आंधळी फाटा आणण्यात आले. परंतु अंतर लांब असल्याने पोहोचण्यास उशीर झाला व उपचार सुरू करण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) चे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार राम लांजेवार यांना दिली. त्यांनी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली असता सर्प दंश झालेल्या युवकास तात्काळ रुग्णालयात उपचार करीता आणले असते तर त्याचा जीव वाचु शकला असता, परंतु सावरगाव ते कुरखेडा हे अंतर अतिरिक्त पंधरा की मी ने जास्त झाल्याने वेळेत ते पोहोचु शकले नाही. शासनाने करण च्या पालकास तात्काळ मदत करावी व रपटा त्वरित दुरुस्ती करून वाहतुक सुरु करावी अशी मागणी राम लांजेवार यांनी केली आहे.