विरली (Bhandara):- लाखांदूर तालुक्यातील कर्हांडला येथे दि.७ जुलै २०२४ रोजी दुपारी १ वाजतादरम्यान जुन्या घराच्या भिंतीजवळ काम करीत असतांना अचानक घराची भिंत (wall)कोसळली. त्यात भिंतीजवळ काम करणारा तरुण मलब्याखाली दबल्याने जागीच मृत्यू (Death)झाला. योगेश खुशाल देशमुख (३५), असे मृतकाचे नाव आहे.
जुन्या घराची मातीची भिंत त्याच्या अंगावर कोसळली
लाखांदूर तालुक्यात सिंचनाची सोय असलेल्या शेतकर्यांनी रोवणीला प्रारंभ केला आहे. तर काही शेतकरी (Farmer)पावसाच्य प्रतीक्षेत असून शेतीची कामे उरकून घेत आहेत. कर्हांडला येथील योगेश देशमुख याचा शेती (Farming)हा मुख्य व्यवसाय होता. दि.७ जुलै रोजी सकाळी मृतक हा शेतावरील काम आटोपून घरी परतला. दुपारच्यावेळी आपल्या जुन्या घराशेजारी काम करीत होता. दरम्यान अचानक जुन्या घराची मातीची भिंत त्याच्या अंगावर कोसळली. त्यात योगेश हा मातीच्या मलब्यात दबला गेला. आवाजाने कुटूंबिय व घराशेजारच्या लोकांनी धाव घेऊन मलब्याखाली दबलेल्या योगेश याला बाहेर काढून लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात (rural hospital) उपचारार्थ नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून योगेश याला मृत घोषित केले.
लाखांदूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
घटनेची माहिती लाखांदूर पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरीता (Autopsy) पाठविले. योगेश याच्या मृत्यूपश्चात पत्नी, एक चिमुकली, असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर दि.७ जुलै रोजी सायंकाळी स्थानिक कर्हांडला समशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेशच्या अपघाती मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने मृतक कुटूंबियाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.