हिंगोली (Youth Death) : वसमत तालुक्यातील मुडी शिवारामधून कालव्यात १९ वर्षीय युवकाचा मृतदेह वाहून गेला होता. १६ फेबु्रवारीला पिंपळा चौरे शिवारातील कालव्यात हा (Youth Death) मृतदेह आढळून आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील चंदनगव्हाण येथील अभय रामा सुर्यवंशी (१९) हा तरूण १४ मार्च रोजी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुडी शिवारातील मित्राकडे धूलिवंदनाकरीता गेला होता. तेथे रंग खेळल्यानंतर मित्रांसोबत मुडी शिवारातील कालव्यात अंघोळी करीता गेलला होता. कालव्याच्या पाण्याचा प्रवाह त्याच्या लक्षात आला नसल्याने तसेच त्याला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत असताना सोबत असलेल्या मित्रांनी आरडा ओरड करून त्याला (Youth Death) वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतू तो बराच दूर वाहून गेला.
याबाबतची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने कालव्याच्या पाण्यात मागील दोन दिवसापासून शोध मोहीम सुरू होती. १६ मार्च रविवार रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास पिंपळा चौरे शिवारातील कालव्यामधील पाण्यात मृतदेह तरंगतांना आढळून आला. याची माहिती पोलिसांना मिळताच वसमत ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार विजयकुमार उपरे, रामा लोखंडे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने अभयचा मृतदेह पाण्याबाहेर काढून वसमत उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. (Youth Death) मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मयत अभय यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.