परभणीतील रेल्वेगेट उड्डाणपुलच्या परिसरातील घटना
मयत शंकर नगरातील रहिवाशी
परभणी (Youth death Case) : शहरातील अक्षदा मंगल कार्यालय परिसरात निर्माधिन उड्डाणपुलाचे काम सुरु असताना क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे पादचारी इसमास क्रेनची धडक बसून त्याचा मृत्यू झाला. ही शनिवार ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मयताचा भाचा अनिल सुर्यंवशी यांनी (Youth death Case) नवामोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मामा विश्वनाथ अभिमन्यू भराडे हा शनिवार ४ जानेवारी रोजी शनिवार बाजारात मजूरीसाठी गेला होता. सायंकाळी कामावरुन शंकर नगरकडे अक्षदा मंगल कार्यालय मार्गे येत होता. रात्री ७.३० वाजेच्या सुमारास क्रेनचे काम सुरु होते.
त्यावर काम करणार्या क्रेनचालकांने आपले एमएच.२२ एडब्ल्यू – ३७०८ या क्रमांकाचे क्रेन वाहन निष्काळजी व हलगर्जीपणे चालवून विश्वनाथ अभिमन्यू भराडे यांना धडक दिली. या (Youth death Case) धडकेत विश्वनाथ भराडे यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अनिल सुर्यवंशी यांनी नवामोंढा पोलिस ठाण्यात दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नवामोंढा पोलिस ठाण्यात सुरु होती.