परभणी जिल्ह्यातील सेलूच्या राजगड कॉलनीतील घटना ट्रॅकटर चालकाचा जागीच निधन
परभणी/सेलू (Youth Death) : शहरातील राजगड कॉलनी परिसरात ट्रॅक्टर ट्रॉलीस विजेच्या खांबावरील लोंबलेल्या विजेच्या तारा ट्रालीला आडकल्याने एका २५ वर्षीय तरुणाचे जागीच निधन झाले. ही (Youth Death) घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी चार च्या सुमारास घडली. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील फुलेनगर मधील रहिवाशी असलेल्या पवन संतोष डुबल वय २५ वर्ष हा तरुण आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने एका जिनिंग मधून भुसा टाकण्यासाठी एकनाथ नगर येथून जात असताना राजगड कॉलनी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ त्याच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला खांबावरून लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा आडकल्याने झालेल्या अपघातात चोराचा शॉक लागल्याने चालक पवन डुबल याचे जागीच निधन झाले.
पोलीसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. (Youth Death) शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. रात्री अकराच्या सुमारास मयत पवन डुबल याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैभव भगवानराव डुबल यांने दिलेल्या फिर्यादीवरून १९४अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद सेलू पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के. आर. मुलगीर पुढील तपास करत आहेत.
मयत पवन डुबले याच्या पाश्चात आजी, आई, वडील, एक लहान भाऊ, एक विवाहित बहीण, पत्नी असा परिवार आहे .पवन डुबल याचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला होता. या (Youth Death) आघटीत घडलेल्या घटनेमुळे फुलेनगर सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.