बासंबा (Youth death) : हिंगोली तालुक्यातील बासंबा या गावातील २२ वर्षीय तरुणाचा १ डिसेंबर सायंकाळच्या सुमारास मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. हिंगोली तालुक्यातील बासंबा या गावातील चेतन निवृत्ती घुगे (२२) हा तरुण १ डिसेंबर रोजी दुचाकीने सिरसम येथून परत येत असताना जुमडा पाटी जवळ उभारण्यात आलेल्या लोखंडी डिव्हायडरला त्याच्या दुचाकीची जोराची धडक बसली.
यामुळे त्याच्या डोक्याला व पायाला जबर दुखापत झाली. यामध्ये त्याचा (Youth death) जागीच अंत झाला. सदरील घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह गावकर्यांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांना याविषयी कल्पना दिली. मयताचा मृतदेह हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला व बासंबा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. मयत चेतन घुगेच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण, चुलते, काकू, चुलत भाऊ असा मोठा परिवार असून त्याच्या दुःखद निधनामुळे बासंबा गावावर शोकाकळा पसरली आहे.