गडचांदूर भोयगाव मार्गांवरील घटना
कोरपना (Youth death) : गडचांदूर-भोयगाव मार्गावर लखमापूर जवळ पेट्रोल पंप पासून काही अंतरावर रस्याच्या कडेला उभ्या ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार शुभम अनिल थेरे वयवर्ष अंदाजे २५ रा.वार्ड नंबर ३ गडचांदूर,या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.सदर घटना ३० ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी अंदाजे ७ च्या सुमारास घडली आहे.पेट्रोल पंपवरील कर्मचारी आणि वाटसरूंनी एका कारमध्ये बसून शुभमला गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला (Youth death) मृत्यू घोषित केले.शुभम हा एकुलता एक मुलगा असून त्याला एक बहिणी असल्याचे कळते.एकुलत्या एक तरूण मुलाच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परिसरात शोककळा पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच (Gadchandur Police) गडचांदूर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला.
दरम्यान बेदरकारपणे अशाप्रकारे भररस्त्यात मोठमोठे वाहन उभे करत असल्याने अपघातात (Youth death) वाढ होत असल्याचे संतापजनक आरोप नागरिकांकडून होत आहे. गडचांदूर-भोयगाव मार्गावरील लखमापूर, निमणी जवळ या दोन महिन्यात जवळपास ८ पेक्षा जास्त निष्पाप लोकांचा बळी गेल्याने नागरिकांकडून (Gadchandur Police) पोलीस प्रशासना विरोधात कमालीचा रोष पहायला मिळत आहे.रस्त्यावर उभी वाहने, हा मुद्दा ऐरणीवर आला असून पोलिसांच्या सततच्या कारवायांना सुद्धा वाहन चालक जुमानत नसल्याने पोलिसांनी वाहन चालक पाठोपाठ मुख्यत: ट्रान्सपोर्ट कंपनी संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.