ग्रामीण रुग्णालयात उपचार!
आखाडा बाळापूर (Youth Death) : आज दुपारी आखाडा बाळापूर कांडली शिवारात ट्रॅक्टर (Tractor) उलथून एक युवक ठार झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला त्यास उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी सायंकाळी सांगितले.
ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव!
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी कळमनुरी तालुक्यातील कांडली येथील विश्वनाथ संजयराव पतंगे व कुणाल रामदास पानपट्टे दोघे युवक ट्रॅक्टर घेऊन आखाडा बाळापूर बोल्डा रोड बायपास सर्व्हिस रोडने कांडली गावाकडे जात असताना अचानक ट्रक्टर टायर फुटून ट्रक्टर उलथून यात ट्रॅक्टर खाली दबून विश्वनाथ संजयराव पतंगे यांचा मृत्यू झाला तर कुणाल रामदास पानपट्टे गंभीर जखमी झाला ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी नांदेड हलवण्यात आले.
अपघात झाले समजताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख राहुल पतंगे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी तातडीने उपचारासाठी हलवले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पंढरीनाथ चव्हाण, प्रशांत शिंदे, राजु ठाकूर, शिवाजी पवार पोलीस पथकाने धाव घेतली.