परभणी (Parbhani):- बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने डोक्यास जबर मार लागला. उपचारादरम्यान ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना २२ मे रोजी रात्री १० च्या सुमारास शहरातील अजिजीया नगर भागात घडली. सदर प्रकरणी २३ मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात या अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
आकस्मात मृत्युची नोंद
रवि रामकिशन नवले वय ३२ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. या बाबत भारत नवले यांनी खबर दिली आहे. रवि नवले हे आपल्या घरातील बाथरुममध्ये गेले होते. यावेळी पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत(injury) झाली. त्यांना उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात(Government hospitals) दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रवि नवले यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी २३ मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची(sudden death) नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. ताटीकोंडलवार करत आहेत.