हिंगोली(Hingoli):- तालुक्यातील राहोली खुर्द पाटीवर शनिवारी रात्री ८ च्या सुमारास दोन वाहनाच्या अपघातात एका युवकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी युवक जिल्हा शासकीय रुग्णालयात(District Government Hospitals) उपचारासाठी आणण्यात आला असता त्याचाही मृत्यू झाला. अपघातात(accidents) दोन्ही युवकांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील एनटीसी भागातील शुभम पंडीतराव पारसकर (२८) व त्याचा मित्र वैभव प्रभाकर पाटील रा. महागाव जि.यवतमाळ हे दोघेजण सेनगाव येथून वाहनावरून हिंगोलीकडे येत होते. रात्री ८ च्या सुमारास दोन भरधाव वाहनाची धडक (Vehicle collision) होवुन अपघातात शुभम पंडीतराव पारसकर हा जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती पोलीसांच्या ११२ वाहन क्रमांकाला मिळताच घटनास्थळी दाखल झाले. यातील गंभीर जखमी वैभव पाटील याला तात्काळ हिंगोली येथील जिल्हा शासकिय रुग्णालयात आणण्यात आले.
त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला. या दोघाचेही शवविच्छेदन (Autopsy)जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेसंदर्भात हिंगोली ग्रामीण पोलीसात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याने पोलीसांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष वाठोरे हे करीत आहेत. दरम्यान मृतक शुभम पारसकर याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. परिवारात तो एकुलता एक मुलगा होता. शुभम याच्यावर २८ एप्रिल रोजी कयाधु नदीच्या तिरावर स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले.