पुसद(Yawatmal):- ग्रामीण पोलीस स्टेशन (Police Station) अंतर्गत येत असलेल्या पुसद वाशिम रोड वरील जनुना फाटा येथे पुसद शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी दुचाकीने पुण्याकडे जात असलेल्या युवकाचा केटीसी ट्रक क्र. एपि १६ टीसी ८१३५ महिंद्रा ट्रकच्या चालकाने धोकादायक वळणावर वाहतुकीस अडथळा होईल या अवस्थेमध्ये स्वतःचा ट्रक उभा केला असताना कोणत्याही पद्धतीची सुरक्षेची काळजी न घेता युवकाचा ट्रकच्या मागील बाजूस धडक मारून अपघातामध्ये घटनास्थळीस ठार झाल्याची घटना ६ जूनच्या पहाटे सकाळी चार वाजताच्या दरम्यान सदरील भीषण अपघात (terrible accident) घडला.
ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या अपघातामध्ये दुचाकी चालक दत्तविजय मारकड (२२) रा. दहिवड ता. पुसद हा जागीच ठार(killed) झाला. फिर्यादी आनंदराव शामराव काळे यांच्या फिर्यादीनुसार ट्रकचालक आरोपी(accused) याच्या विरुद्ध कलम ३०४(अ) नुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल फुलंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार संदेश पवार करीत आहेत. तातडीने घटनास्थळी ग्रामीण पोलिस शेख मकसूद पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.