मारेगाव (Youth Accidental Death) : पोलीस स्टेशन हद्दीतील सालेभट्टी येथील ऐका युवकाचा गावाकडे जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पडून अपघातात मृत्यू (Youth Accidental Death) झाल्याची दुर्दैवी घटना १८ ऑक्टोंबरच्या रात्री उघडकीस आली मृतक प्रशांत शंकर नांदे वय ४६ रा. सालेभट्टी असे मृत युवकाचे नाव आहे.
मृतक प्रशांत नांदे हे स्वतःचे क्रूझर वाहन चालवत व त्याच सोबत शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मारेगाव येथे खासगी कामािनमित्त दुचाकीने आला होता. रात्री ९ वाजताचे दरम्यान गावाकडे परत जात असतांना मांगरूळ ते सालेभट्टी रस्त्यावरील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो रोडच्या कडेला खाली पडला. बराचवेळ पडून असतांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने व मानेला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत प्रशांत च्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी बराच मोठा आप्त परिवार आहे.