बासंबा (Youth Murder Case) : शिवारात येळी येथील एका तरूणाचा दगडाने ठेचून खुन केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवून मयताची ओळख पटविल्यानंतर या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींनाही जेरबंद केले. बासंबा फाटा ते सावरखेडा मार्गावर २२ मार्च रोजी दुपारच्या सुमारास काही (Youth Murder Case) शेतकरी लक्ष्मण घुगे यांच्या शेतात काम करीत असतांना अचानक एक अनोळखी मृतदेह तोंडावर वार करून छिन्न विछन्न अवस्थेत दिसून आला.
याबाबतची माहिती बासंबा पोलिसांना कळविताच सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे यांच्यासह पथक घटनास्थळी धाऊन आले. सदरील अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता येळी येथील एक महिला आपला मुलगा कालपासून घरी आला नसल्याबाबत तक्रार देण्याकरीता बासंबा पोलिस ठाण्यात आली होती. त्यामुळे ठाण्यातील (Youth Murder Case) कर्मचाऱ्यांनी महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून तिला घटनास्थळावर नेले असता त्याच्या अंगावरील कपड्यावरून फेरोजखॉ फरीदखॉ पठाण (१८) हा असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी बाजूला मोठे दगड, एक लाकडी दांडा व मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचलेला दिसून आल्याने पोलिसांनी सदर महिलेकडे विचारपूस केली. यावेळी मृतदेह जिल्हा शासकीय शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला.
घटनास्थळी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनीही भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेतली. या (Youth Murder Case) प्रकरणी मयताची आई मालनबी पठाण यांनी बासंबा पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी रितसर तक्रार दिली.
ज्यामध्ये एका मुलीसोबत बोलण्यास अडथळा निर्माण होत असल्याने फेरोजखॉ यांचा दिपक सखाराम बोरकर, सुरज भारत जाधव रा. येळी या (Youth Murder Case) दोघांनी खून केला असल्याचे नमूद केले. त्यावरून सपोनि विकास आडे, पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, प्रविण राठोड यांच्यासह पथकाने तात्काळ तपासचक्र फिरवून दोन्ही आरोपींना अटक केली. या (Youth Murder Case) प्रकरणाचा पुढील तपास सपोनि विकास आडे हे करीत आहेत.