नांदेड (Nanded):- लोकसभा मतदारसंघाच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे एका युवकाने दुपारी चार वाजताच्या सुमारास मतदान केंद्र क्रमांक 105 येथे लोखंडी वस्तूने ईव्हीएम मशीन (EVM machine) फोडण्याची घटना घडली आहे. आरोपी युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून रामतीर्थ येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे.”
रामतीर्थ ता. बिलोली जि. नांदेड येथील मतदान क्रमांक 105 वर व्यवस्थित मतदान सुरू होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गावातीलच भैय्यासाहेब आनंदराव एडके हा तरुण मतदान करण्यासाठी आला. मतदान कक्षात असतानाच त्याने, ‘हे सर्व संविधानाच्या विरोधात असून मला मान्य नाही’ असे म्हणत लोखंडी वस्तूने(iron goods) त्या ठिकाणी असलेली ईव्हीएम मशीन फोडून टाकली. मतदान अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त असताना अचानक तरुणाने ईव्हीएम मशीन फोडल्याने मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ईव्हीएम फोडणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन रामतीर्थ पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची माहिती समजताच बिलोलीचे अधिकारी व नांदेड येथून अतिरिक्त पोलिस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मतदान केंद्राला पोलिसांच्या छावणीचे रूप आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अधिक चौकशी केली जात आहे.