पाथरी (Youth suicide) : रविवारी रात्री ढालेगाव पुलावरून बंधाऱ्यांमध्ये उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह मंगळवार २४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये तरंगताना आढळून आला. (Youth suicide) मृतदेहाचे माजलगाव येथे शवविच्छेदन केल्यानंतर रामपूरी येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
शहराशेजारील ज्ञानेश्वर नगर येथील प्रशांत माणिकराव गीते (वय २९ ) या विवाहित तरुणाने रविवार २२ सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास अज्ञात कारणाने माजलगाव हून पाथरी कडे येत असताना ढालेगाव पुलावर चार चाकी गाडी थांबवत बंधाऱ्यांमध्ये उडी घेऊन (Youth suicide) आत्महत्या केली होती . त्यानंतर सोमवारी माजलगाव पोलीस व पाथरी पोलिसांनी यांच्यासह पाथरी मानवत च्या अग्निशमक जवानांनी दिवसभर शोध मोहीम राबवली होती. पावसाचा व्यत्यय आल्यानंतर सदरील शोध मोहीम थांबवण्यात आली होती.
मंगळवार २४सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास सदरील युवकाचा मृतदेह बंधाऱ्याच्या पाण्यावर माजलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तरंगताना आढळून आला. दरम्यान सकाळी साडेदहाच्या सुमारास माजलगाव पोलिसांनी मृतदेह (Youth suicide) ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी माजलगाव येथील रुग्णालयामध्ये नेला होता. दुपारी मयत प्रशांत गीते याच्या मृतदेहावर रामपुरी रत्नेश्वर येथील स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.