परभणी/ताडकळस (Youth suicide Case) : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताडलिमला येथील एका तरुणाने शेतातील करंजीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की, ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताडलिमला येथील सुभाष निवृत्ती नावळे वय २३ या तरुणाने मंगळवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतातील करंजीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन (Youth suicide Case) आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
या घटनेची माहिती सपोनि.गजानन मोरे यांना मिळताच त्यांनी तात्काळ सपोउपनि. गणेश लोंढे, पोकाँ. रामकिशन काळे यांना घटनास्थळी पाठवुन घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह मरणोत्तर तपासणीसाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. ताडकळस पोलिस ठाण्यात या (Youth suicide Case) प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील तरुणांने आत्महत्या (Youth suicide Case) का केली? याचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.