अठरा वर्षीय तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू
परभणीच्या पाथरी पोलिसात नोंद…!
परभणी/पाथरी (Youth Suicide Case) : मोबाईल का घेत नाहीत म्हणून रागाच्याभरात १८ वर्षीय तरुणाने विषारी द्रव प्राशन केले. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. या (Youth Suicide Case) प्रकरणी २७ डिसेंबरला पाथरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, पाथरी तालुक्यातील केदारवस्ती येथे सदर घटना घडली. हनुमंत तिडके यांनी खबर दिली आहे. त्यांचा मुलगा अक्षय तिडके वय १८ वर्ष याने १४ डिसेंबर रोजी मोबाईल का घेत नाहीत म्हणून रागाच्याभरात राहत्या घरी पिकावर फवारणी करण्याचे विषारी द्रव प्राशन केले. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान अक्षय तिडके याचा मृत्यू झाला. या (Youth Suicide Case) प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. हातागळे करत आहेत.