देव्हाडी-तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील घटना
तुमसर (Youth suicide) : तालुक्यातील देव्हाडी तुमसर रोड रेल्वे स्थानकासमोर काही अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावर अहमदाबाद – पुरी एक्स्प्रेस रेल्वे गाडीच्या समोर येऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली. संदिप बळीराम रोडगे (३९), रा.बहेवाडा, ता.तिरोडा, जि.गोंदिया, असे (Youth suicide) आत्महत्या करणार्या युवकाचे नाव आहे.
तुमसर रोड रेल्वे स्थानका समोर येथील रेल्वे कर्मचारी कर्तव्यावर असताना सदर युवक रेल्वेच्या गाडीच्या समोर येऊन (Youth suicide) आत्महत्या केल्याची घटनेची माहिती रेल्वे पोलीसांना देण्यात आली. दरम्यान रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचानामा करु़न मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Youth suicide) मृतक युवकाच्या हातावर एस नाव लिहले आहे. अंगात काळ्या रंगाची टि शर्ट व निळ्या रंगाचा जिन्स पॅन्ट घातलेला आहे. सदर घटनेची नोंद देव्हाडी पोलिसात करण्यात आली असून, सदर घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.