परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आडगाव लासीना येथील घटना आकस्माक मृत्यूची नोंद!
परभणी (Youth Suicide) : नोकरी नाही, कामधंदा लागत (Unemployment) नसल्याने नैराश्यात तरुणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास पूर्णा तालुक्यातील आडगाव लासीना येथे उघडकीस आली. या प्रकरणी 8 ऑगस्टला पूर्णा पोलिसात (Purna Police) आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंडीतराव भालेराव यांनी खबर दिली आहे. ऋषीकेश पंडीतराव भालेराव असे मयत तरुणाचे नाव आहे. पंडीतराव यांचा मुलगा ऋषीकेश याने नोकरी व काही कामधंदा लागत नसल्याने ताणतणावात आणि नैराश्यात राहुन घरातील छताच्या लोखंडी हुकाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी पूर्णा पोलिसात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि. चाऊस करत आहेत.
