उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या हस्ते धनादेरा सुपुर्द
पाथरी (Maratha reservation) : परभणी/पाथरी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील सारोळा येथील तरुणांनी आत्महत्या केल्याची (Maratha reservation) घटना घडली होती. या प्रकरणी आता शासनाकडून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
सारोळा येथील तरुणाने केली होती आत्महत्या
तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील मराठा युवक आकाश प्रकाश बुलंगे यांनी (Maratha reservation) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली होती. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आत्महत्याग्रस्त मराठा युवकाच्या पश्चात वारस म्हणून त्यांच्या पत्नीस दहा लाख निधीचा धनादेश मंगळवार १ ऑक्टोबरला रोजी तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी शैलीश लाहोटी यांच्या हस्ते देण्यात आला . याप्रसंगी पाथरीचे तहसीलदार एस. एन. हांदेश्वर , मानवत तहसीलदार पांडुरंग माचेवाड उपस्थित होते.