सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात निषेध आंदोलन
तुमसर/भंडारा (Yuva Sena Andolan) : भंडारा-तुमसर-बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर पडले मोठ मोठे खड्डे…खड्ड्यात नागरिकांनी ‘सार्वजनिक बांधकाम विभागाची श्रद्धांजली’ खड्डे भ्रष्टाचारा चे अड्डे अश्या प्रकारचे बॅनर हातात धरून थेट बांधकाम विभागाच्या भंडारा -तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील पाणी भरलेल्या खड्ड्यात बसुन युवा सेनेचा तालुका प्रमुख पवन खवास यांनी आंदोलन (Yuva Sena Andolan) केले. भंडारा -तुमसर -बालाघाट हा दोन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग असुन या महामार्गावर ठीक -ठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडले आहेत.
तुमसर वरून मध्यप्रदेशला जाणारा महत्त्वाचा मार्ग खड्डेमय झाला आहे. दररोज अवजड वाहतूक याच मार्गाने जात असताना महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. मात्र या खड्ड्याकडे बांधकाम विभाग अक्षरशः दुर्लक्ष करीत आहेत. याच मार्गावर अनेकदा अपघात देखिल झाले असून परिणामी नागरिकांना प्राणाला मुकावे लागले आहे.
शाळकरी मुले- मुली शाळेत जात असताना त्यांच्या अंगावर अनेकदा चिखल उडून त्यांचे गणवेश चिखलाने माखले असतात मात्र स्थानीक नागरिकांनी अनेकदा बांधकाम विभागाला निवेदन देऊन सुध्दा या कडे दुर्लक्ष होत आहे. (Yuva Sena Andolan) त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार काय असा सवाल देखिल येथे उपस्थीत केला जात आहे.
तर नागरिकांनी भंडारा- तुमसर- बालाघाट राष्ट्रीय खड्डेमय महा-मार्गावर नागरिकांच्या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग, व सत्तेतील सत्ता पीपासुंना यांना भावपूर्ण श्रद्धांजली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या .. खड्ड्यात पाय…खड्डे भ्रष्टाचारांचे अड्डे..!! गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, असा बॅनर खड्ड्यात लावून खड्डयात बसून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करीत खवास. यांनी आंदोलन केला आहे.तसेच जोपर्यंत रस्त्याची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशाराही शिवसेना तालुका युवासेना प्रमुख पवन खवास यांनी दिला आहे. (Yuva Sena Andolan) आंदोलनाच्या वेळी ईश्वर भोयर,संजय झंझाड,मनोज चौबे, निलकंठ सिंगाडे, अमोल खवास,आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.