जम्मू (Z-Morh Tunnel) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सोमवारी जम्मू आणि काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या झेड-Z-Morh/ सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. लडाख आणि जम्मू आणि काश्मीर दरम्यान सर्व हवामानात सुरळीत आणि सुरक्षित संपर्क सुनिश्चित करण्यासाठी हा (Sonamarg tunnel) बोगदा बांधण्यात आला आहे. (PM Narendra Modi) पंतप्रधानांच्या या भेटीकडे देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. ज्यामुळे केवळ प्रादेशिक संपर्क वाढणार नाही तर पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्था देखील मजबूत होणार आहे.
आज पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) सोनमर्ग बोगद्याला भेट दिली आणि बोगद्याचे औपचारिक उद्घाटन केले. यासोबतच, पंतप्रधान जनतेला संबोधित करणार आहेत. ज्यामध्ये ते या (Z-Morh Tunnel) बोगद्याचे महत्त्व आणि त्याचे दूरगामी परिणाम अधोरेखित करतील. त्यांचा हा दौरा केवळ प्रादेशिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल नाही तर देशाची सुरक्षा आणि धोरणात्मक तयारी देखील मजबूत करतो.
#WATCH जम्मू-कश्मीर: सोनमर्ग में जम्मू-कश्मीर के उपराज्यपाल मनोज सिन्हा और मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का अभिनंदन किया।
(सोर्स: DD/ANI) pic.twitter.com/BUrstpeujq
— ANI_HindiNews (@AHindinews) January 13, 2025
कडक सुरक्षा व्यवस्था
जम्मू आणि काश्मीर पोलिस, निमलष्करी दल आणि लष्कर संयुक्तपणे या कार्यक्रमासाठी सुरक्षा सुनिश्चित करत आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परिसरात गस्त, शोध मोहीम आणि पाळत ठेवली जात आहे. संवेदनशील ठिकाणी शार्पशूटर तैनात करण्यात आले आहेत आणि ड्रोनद्वारे हवाई देखरेख देखील केली जात आहे. या परिसरावर चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे.
“Z-Morh बोगद्याजवळ सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे आणि (PM Narendra Modi) पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकाने, ज्यामध्ये एसपीजी कर्मचारी समाविष्ट आहेत, कार्यक्रमस्थळाची जबाबदारी घेतली आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) ही भारत सरकारची एजन्सी आहे, जी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करते.
झेड-Morth सोनमर्ग बोगदा
श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर Z-Morh बोगदा 2400 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा 6.5 किमी लांबीचा मोक्याचा बोगदा वर्षभर लडाख प्रदेशाला रस्त्याने जोडण्यास मदत करेल. या प्रकल्पाचे काम मे 2015 मध्ये सुरू झाले आणि गेल्या वर्षी पूर्ण झाले. फेब्रुवारी 2024 मध्ये त्याचे सॉफ्ट उद्घाटन झाले. हा (Z-Morh Tunnel) बोगदा देशाच्या संरक्षण गरजांसाठी महत्त्वाचा आहे. कारण तो चीन सीमेजवळील लडाख प्रदेशाला जोडतो. यासोबतच, यामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
झेड-Morth बोगद्याची वैशिष्ट्ये:
- हा (Z-Morh Tunnel) बोगदा समुद्रसपाटीपासून 8,650 फूट उंचीवर आहे.
- बोगद्याचा मुख्य भाग 6.4 किमी लांब आहे आणि त्यात 7.5 मीटर रुंद आपत्कालीन मार्ग देखील आहे.
- यामुळे श्रीनगर ते सोनमर्ग मार्गे लेह हा प्रवास सर्व ऋतूंमध्ये सुरळीत आणि सुरक्षित होईल.
- बोगद्याच्या बांधकामामुळे आता बर्फवृष्टी आणि हिवाळ्यातही सोनमर्गला पोहोचणे शक्य होईल.
- यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि (Z-Morh Tunnel) सोनमर्ग हे वर्षभर पर्यटनस्थळ बनेल.
झोजिला बोगद्याचे काम 2028 पर्यंत पूर्ण
2028 पर्यंत झोजिला बोगदा पूर्ण झाल्यानंतर Z-Morh आणि झोजिला बोगदे एकत्रितपणे प्रवासाचा वेळ कमी करतील. या (Z-Morh Tunnel) बोगद्यांमुळे श्रीनगर आणि लडाखमधील प्रवास अंतर 49 किमीवरून 43 किमीपर्यंत कमी होईल. यामुळे वाहनांचा वेग ताशी 30 किमी वरून 70 किमी प्रति तास होईल. पंतप्रधान मोदींचा हा दौरा या प्रदेशाच्या विकासाला आणि कनेक्टिव्हिटीला नवीन दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.