सहपालकमंत्री अॅड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते होणार उद्घाटन
कुनघाडा रै (Zadhipatti Natya Sammelan) : झाडीपट्टी रंगभूमीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणार्या देसाईगंज येथे ४ व ५ ऑक्टोबर २०२५ रोजी देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयाच्या पटांगणात पाचवे झाडीपट्टी नाट्य संमेलन आयोजित केले आहे.
नाट्यसंमेलनाचे (Zadhipatti Natya Sammelan) उद्घाटन गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पार पडणार आहे. उद्घाटनीय समारंभास अध्यक्ष म्हणून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आ.विजय वडेट्टीवार, स्वागताध्यक्ष म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. रामदास मसराम तर संमेलनाधक्ष म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी के.आत्माराम हे राहणार आहेत.
संमेलनाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खास्. डॉ. नामदेव किरसान, चंद्रपूर जिल्ह्याच्या खा. प्रतिभा धानोरकर, माजी खा.अशोक नेते, माजी आ. कृष्णा गजबे, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, आ. राजकुमार बडोले उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाची (Zadhipatti Natya Sammelan) जय्यत तयारी झाली असून असून सांस्कृतिक समिती, पुरस्कार समिती, भोजन समिती, स्टेज समिती आदी विविध समित्यांनी कामाला सुरुवात केली आहे. झाडीपट्टीतील तब्बल ५० ते ६० नाट्य संस्था व शेकडो कलावंत संमेलनाच्या तयारीत लागले आहेत. संमेलना झाडीपट्टीतील नामांकित नाट्य संस्था, दिग्दर्शक, नाटककार ,कलाकार, वादक ,यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार ,माजी मंत्री तसेच मराठी रंगभूमीवरील नामवंत अभिनेते ,अभिनेत्री, साहित्यिक ,पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व सेलिब्रिटींचा सहभाग राहणार आहे.
दोन दिवसीय संमेलनाच्या (Zadhipatti Natya Sammelan) यशस्वीतेसाठी झाडीपट्टी रंगभूमीतील नाट्य निर्माते, लेखक संघटना ,कलावंत संघटना ,वादक संघटना ,साऊंड व ध्वनी संघटना, पत्रकार ,स्थानिक संस्था व मंडळी सक्रिय सहकार्य करीत आहेत. झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर , सचिव हिरालाल पेंटर., युवराज प्रधान ,संदीप राऊत, किरपाल सयाम यासह कार्यकारिणीने मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


