झरी (Zari Crime) : येथे एकाच रात्रीत एका घरासह दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्यामुळे (Zari thieves raid) नागरीकांसह व्यापार्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार, झरी येथील जिंतूर – परभणी रस्त्यावरील दोन दुकाने आणि राम मंदिर परिसरातील एक घर चोरट्यांनी गुरुवार ११ जुलै रोजी पहाटे ३.१५ मिनिटांच्या सुमारास फोडून साहित्याची चोरी (Zari Crime) करत काही रक्कम लंपास केली.
झरी येथील घटना, नागरीकांत भितीचे वातावरण
परभणी – जिंतूर रस्त्यावर सांतेष कदम यांचे कदम हार्डवेअर नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी दुकान उघडण्यास गेले असता दुकानात चोरी (Zari thieves raid) झाल्याचे निदर्शनास आले. दुकानात कोणतीही मोठी रक्कम नसल्याने चोरट्यांनी चिल्लर रक्कमेवर डल्ला मारला. चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांच्या हाती लागले आहे. तर राम मंदिर परिसरातील शिवाजी देशमुख यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करत कपाटांची व साहित्यांची नासधूस करत देवाच्या चांदीच्या मूर्तीं लंपास केल्या. याही (Zari Crime) घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आढळून आले आहेत. चोरट्यांनी मारोती कंपनीची झेन गाडी वापरल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.
पोलीसांसह स्थागुशाची घटनास्थळी धाव
झरी येथे घरासह दोन दुकाने फोडल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. विक्रम हराळे, बीट जमादार हाकेसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनि. मुथेपुड, निलेश परसोडे, रवि जाधव, शेख रफीक, तुपसुंदरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान स्वान पथक पाचारण करण्यात आले. (Zari Crime) घटनास्थळाची ठसे तज्ञांनी पाहणी केली. तसेच सपोनि. मुंजे, पोउपनि. पवार, एस.सी. शिंदे, पी.सी. कोंगुलवार आदींनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. वारंवार होत असलेल्या चोरी प्रकरणामुळे झरी ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे (Zari police) झरी येथे पोलीस चौकीची मागणी करण्यात येत आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. विक्रम हराळे करीत आहेत.