हिंगोली (Zilla Parishad) : जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) समाज कल्याण विभागाकडून (social welfare department) दिव्यांग-अव्यांग विवाह करणाऱ्या जोडप्यास प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे १५ जोडप्यांना साडेसात लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी दिली. दिव्यांग व्यक्तीबरोबर अव्यांग अथवा सुदृढ व्यक्तीने विवाहास पुढे यावे व त्यांना सामाजिक समानता मिळावी हा योजनेचा हेतू आहे. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, विस्तार अधिकारी मधुकर राऊत, लक्ष्मण मुंडे व इतर उपस्थित होते.