बुलढाणा (SET Exam) : मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील वर्षा जितेंद्र तारगे (Varsha tarage) यांनी सहाय्यक प्राध्यापक पदाची (SET Exam) (सेट) Mathematical Science’ विषयात उत्तीर्ण केली. वर्षा तारगे यांची काही दिवसापुर्वी पवित्र पोर्टलद्वारे यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती झाली आहे, हे येथे विशेष !
वर्षा जितेंद्र तारगे (Varsha tarage) भारत सरकार अंतर्गत येणा-या महाराष्ट्र राज्य इलिजिबिलिटी टेस्ट करीता सहाय्यक प्राध्यापक पदाची (सेट) परिक्षा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथून Mathematical Science विषयात परिक्षा उत्तीर्ण (SET Exam) केली. त्या चिखली तालुक्यातील शेलसूर येथील माजी सरंपच रविंद्र काळे व मंदाताई काळे यांच्या कन्या आहेत. यशाबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.