सर्वच राजकीय पक्ष लागले निवडणुकीच्या तयारीला!
मानोरा (Zilla Parishad Elections) : काही महिन्यापासून प्रतिक्षा असलेल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा (Local Government Elections) मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. नुकतेच याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष (Political Party) आतापासूनच कामाला लागले आहे. मतदारापर्यंत (Voters), पोहोचण्यासाठी जनसंपर्क वाढविणे, निवडणुकीसाठी नवीन मतदार संघ (Constituency) (सर्कल) पिंजून काढणे आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या, संभाव्य उमेदवारावर (Candidate) बारीक लक्ष ठेवणे आदी रणनितीवर राजकीय पुढारी व नेत्यांनी काम सुरू केले आहे.
सोशल मीडियावर प्रचार, प्रसार करण्याकडे इच्छुक उमेदवार!
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत (Panchayat Samiti Elections) विजय मिळविण्यासाठी योग्य उमेदवार निवडणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या स्तरावर संभाव्य उमेदवारांची चाचपणी करीत आहे. ज्या उमेदवारांची समाजात चांगली प्रतिमा आहे, जे लोकांमध्ये लोकप्रिय आहे. आणि ज्यांच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे. अश्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी प्रत्येक पक्षाकडून सुरू आहे. यासाठी पक्षांतर्गत बैठका आणि यासाठी सर्व्हेक्षण सुरू असल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात आरक्षण घोषित झाल्यानंतरच, राजकीय समीकरणे कशी बदलणार याचे ग्रामीण भागात आतापासूनच चर्चेचे फड रंगत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संघात अनेक ठिकाणी छोटे मोठे मेळावे आयोजित करण्यात येत असुन, लग्न समारंभातील गाठी भेटीवर भर दिला जात आहे. त्यासोबतच सोशल मीडियावर प्रचार, प्रसार करण्याकडे इच्छुक उमेदवार वळले आहेत.
मतदारांच्या दारात योजना कश्या पोहोचतील याकडे लक्ष दिले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका (Zilla Parishad Elections) जसजसे जवळ येईल तसतसे ग्रामीण भागातील राजकीय राजकारण हळूहळू तापायला सुरुवात होणार आहे. ग्रामीण भागातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळे कार्यक्रम राबवित आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून इच्छुक उमेदवारांनी जनतेच्या प्रलंबित असलेल्या प्रशासकीय कामावर (Administrative Work) भर दिला जात आहे. मतदारांच्या दारात योजना कश्या पोहोचतील याकडे लक्ष दिले जात आहे. याशिवाय कार्यकर्त्यांना गोळा करून गावोगावी बैठका घेण्याचे निर्देश देण्यात येत आहे. विशेषत बाशिंग बांधून असलेल्या उमेदवाराकडून जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे. तर काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विविध शासकीय कागद पत्रांच्या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार थेट मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेताना दिसत आहे.