परभणी/मानवत (Zilla Parishad) : तालुक्यातील इरळद येथील पूर्वीची भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा व आताची पीएमश्री व आदर्श शाळेतील शिक्षकांची रिक्त असलेली पदे तात्काळ भरा या मागणीसाठी इरळद येथील ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. तसेच सोमवार १ जुलै पासून शाळेसमोर (Hunger strike) बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मानवत तालुक्यातील इरळद येथील पिएमश्री व आदर्श शाळेत शिक्षकांची विषय निहाय विज्ञान/ गणित २ जागा , भाषा पदवीधर २ जागा, सामाजिक शास्त्र २ जागा , प्राथमिक शिक्षक १ जागा अशी एकुण ७ शिक्षकांची रिक्त पदे आहेत.
परभणीतील इरळद येथील शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
ही शाळा पीएमश्री मध्ये निवडलेली शाळा आहे. तसेच आदर्श शाळा म्हणून ही शाळा निवडलेली आहे. सन २०२३-२४ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात मानवत तालुक्यात प्रथम बक्षीस मिळालेले आहे. जिल्हा परिषदेला (Zilla Parishad) अभिमान वाटावा अशी शाळा असतांना मागील वर्षी या (Zilla Parishad) शाळेतील शिक्षकाच्या बदल्या करू नये म्हणून इरळद या गावाने मोठे आंदोलन केले होते. परंतु प्रशासनाने ६ शिक्षकांच्या बदल्या केल्या. नंतर रिक्त पदे ही भरले नाहीत. लोकसहभागातून ४ शिक्षक घेऊन शाळेची गुणवत्ता कायम ठेवली आहे. तसेच विविध स्पर्धा परीक्षेत शाळेने यश मिळविले असून २४ जून रोजीची पटसंख्या वर्ग ६ वा ८१ विद्यार्थी, वर्ग ७ वा ६८ विद्यार्थी, वर्ग ८ वा ७३ विद्यार्थी एवढी आहे.
पीएमश्री व आदर्श शाळेतील रिक्त पदे भरण्याची मागणी
या वर्षी शाळेची पटसंख्या प्रवेश महोत्सव राबवून २२२ पर्यंत वाढवली आहे. अशा २२२ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक नसणे ही गोष्ट जिल्हा परिषदसाठी लाजिरवाणी आहे. या शाळेत तालुक्यातील मानवत, कोल्हा, कोल्हावाडी, सावंगी मगर, मानवत रोड, शेलवाडी, सोन्ना, ढेंगली पिंपळगाव, मंगरूळ पा.प. अशा १० गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यामुळे या (Zilla Parishad) शाळेतील शिक्षकांची रिक्त असलेली पदे ३० जून पर्यंत भरा अन्यथा १ जुलैपासून शाळा बंद करून शाळेसमोर (Hunger strike) बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत २४ जून रोजी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला होता.
परंतु जिल्हा परिषदेने (Zilla Parishad) या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे सोमवार १ जुलैपासून ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून शाळेसमोर (Hunger strike) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास सरपंच अशोक कचरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप मुळे, अँड. हिम्मतराव बारहाते, रामप्रसाद कचरे, माणिक महाजन, विष्णू बारहाते, विष्णू मुळे, हनुमान कचरे, अक्षय बारहाते, एकनाथ मुळे, बाबासाहेब खरात, पवन बारहाते, प्रवीण मुळे, सागर इंगळे, हनुमान खरात यांच्यासह अनेक ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसले आहेत.