पोषण आहाराची पाहणी, शिक्षकांची तारांबळ
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Zilla Parishad School) : अचानक विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन वाटप सुरू असतानाच सभापती पडघान यांनी सहकर्यांसोबत शाळेला भेट दिली व स्वतः मुलांना देण्यात येणारी खिचडी स्वतः खाऊन बघितली त्यामूळे शिक्षक मंडळींची अक्षरशः तारांबळ उडाली शाळेमध्ये शिकणारी मुले हि सर्व आपली घरची मुले आहेत त्यामूळे त्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाचा दर्जा उत्तम ठेवावा अशा सूचना यावेळी पडघान यांनी केल्या.
चिखली तालुक्यातील 15 हजार लोकसंख्या असलेल्या मेरा बु येथे (Zilla Parishad School) जिल्हा परिषदेची एका वर्गाच्या दोन दोन तुकड्या असलेली चौथी ते पाचवी पर्यत शाळा आहे. या शाळेत मुख्याध्यापक परिहार यांच्या मार्गदर्शनात आठ शिक्षक काम करतात. या जिल्हा परिषद शाळेत चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने दरवर्षी या शाळेचे विद्यार्थी शिषवृत्ती, नयोदय विद्यालया मध्ये निवड होते.
अशा या (Zilla Parishad School) शाळेची शाळा व्यवस्थापण समितीची नवीन कार्यकारणी दोन महिन्यापूर्वी निवडण्यात आली त्यामध्ये नवनिर्वाचित सभासपती रामदास पडघान व उपसभापती संदीप सुरुषे यांच्या सह सदस्यांची नेमणूक करण्यात आली. निवडीनंतर रामदास पडघान शाळेचे बंद आवस्थे मध्ये असलेले सी सी टी व्हि कॅमेरे ग्रामपंचायत कडे पाठपुरावा करून सुरू करून घेतले मुलांना मिळणारा पोषण आहार चांगल्या दर्जाचा असावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आज पहिल्यादाच समितीचे सभापती व उपसभापती आणि सदस्य यांनी अचानक पोषण आहार विद्यार्थाना वाटपच्या वेळी शाळेत धडकले. अचानक समितीचे सर्व पदाधिकारी शाळेत येताच मुख्याध्यापक व शिक्षकांची तारांबळ उडाली.
आता हे काय करणार काय प्रश्न विचारणार हा मोठा प्रश्न शिक्षकांना पडला मात्र या (Zilla Parishad School) सदस्यांनी विद्यार्थ्यां मध्ये जावून आम्हाला खिचडी द्या, असे म्हणताच शिक्षकांनी पोषण आहार त्यांना दिला सर्वांनी खिचडीचा आश्वाद घेतला असता चवदार असून मेनू नुसार बनविण्यात आलेली आढळून आली असून शिक्षकांना सांगितले की शाळेमध्ये शिकणारी मुले हि सर्व आपली घरची मुले आहेत. त्यामूळे त्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाचा दर्जा उत्तम ठेवावा, अशा सूचना यावेळी सभापती पडघान यांनी केल्या. यावेळी मुख्याध्यापक परिहार, वायाळ, फदाट, मापारी घुसळकर, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, अंगणवाडी सेविका मदतीनस उपस्थित होत्या.