– प्रताप मोरे
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Zilla Parishad school) : ग्रामीण भागातील मुले मुली शाळेत जाण्यासाठी आई वडिल , आजी आजोबा यांच्या सोबत सकाळी लवकरच झोपेतून उठून शाळेची तयारी करतात आणि (Zilla Parishad school) शाळेत जाण्यापूर्वी घाईघाईने राहिलेला गृहपाठ पूर्ण करतात , भाकर तुकडा खावून मित्र-मैत्रिणींसोबत शाळेच्या स्कूल बसमध्ये संपुर्ण गावातून फिरत शाळेत पोहोचतात. त्यातही मोबाईलचे वेड लागल्यामुळे मुलांची झोप होत नाही आणि आरोग्यही बिघडत असल्याने विद्यार्थांच्या मानसिकतेवर परिणाम होवून गुणवत्ता खालावत आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होवू नये आणि शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व पायाभूत स्वरूपाच्या शिक्षणावर भर देण्यासाठी (Education Department) शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामूळे या आदेशाची शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही, यासाठी गट शिक्षण अधिकारी पाटील शाळेवर करडी नजर ठेवत शाळेला अचानक भेटी देणार आहेत. त्यामूळे आता मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या घरगुती खाजगी कामास ब्रेक बसणार आहे.
चिखली गट शिक्षण अधिकारी आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात (Zilla Parishad school) जिल्हा परिषदच्या मराठी व उर्दू हायस्कूल सह एकूण १५८ शाळा आहेत . या शाळेचा कारभार पाहण्यासाठी १५ पैकी ११ केंद्र प्रमुख कार्यरत असून एकूण ६२९ शिक्षकापैकी ६०० शिक्षक कार्यरत आहेत . त्यामध्ये १ ते ५ आणि ६ ते ८ चे एकूण २९६७१ विध्यार्थी पूरक पोषण आहारासाठी पात्र आहेत.
या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थांना शासनाच्या विविध योजना आणि शाळेत चांगलें व दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी केंद्र प्रमुख आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. असे असतांना मात्र ग्रामीण भागातील शाळेवरील शिक्षक कामात हलगर्जी पणाकरुण घरगुती खाजगी व्यवसायात जास्त वेळ देतात आणि शाळेतही एकमेकाच्या हेवेदावे मनात ठेवून विद्यार्थांना पाहिजे तसे शिक्षण देत नाहीत त्यामुळे विध्यार्थांच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होवू लागला आहे. त्यामुळे जोडधंदा करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीत असताना दुसरा व्यवसाय किंवा खासगी नोकरी करण्यास निर्बंध आहेत. प्रत्येक शिक्षकाला मुख्यालयात राहणेही बंधनकारक आहे. परंतु शिक्षक कर्तव्याशी दगा करून घटनात्मक कार्याचे पालन न करता विविध खासगी बॅंक आणि कंपन्यांचे एजंट, प्रतिनिधी बनून व्यवसाय करत आहेत. यावर आळा बसावा यासाठी शासनाने शाळेची वेळ बदण्याचा निर्णय घेतला त्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते ५ वाजेपर्यंत आणि शनिवार वर्ग १ ते ४ सकाळी ९ ते १२.३० आणि वर्ग ५ ते १० साठी ७.२० ते ११ .०० वाजे पर्यंत वेळेत बदल करण्यात आला आहे.
परंतु मुख्याध्यापक यांनी सोमवार ते शुक्रवार या दिवशी दररोज सकाळी १० वाजता शाळेवर उपस्थितीत राहून अर्धा तास शाळेची साफसफाई करून घेणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांना विश्वासात घेवुन शाळेची कामाचे नियोजन करणे , ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविणे आदी कामकाज हाताळून सर्व शिक्षकांना १०.३० वाजता दैनिक परिपाठ घेण्यास सुरवात करणे त्यामध्ये राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, सविंधान, देशभक्ती गीत, सुविचार, महाराष्ट्र गीत, बोधप्रद गोष्ट, नैतिक मूल्य, शिक्षण अशा एकूण १० मुद्यावर परिपाठ घेणे गरजेचे आहे.
११ वाजता शाळेत विद्यार्थांना शिक्षणाचे धडे सुरू होताच शिक्षकांनी आपले मोबाईल बाजूला ठेवून द्यावे , शाळेच्या गणवेशात विद्यार्थांना शिक्षण द्यावे , गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणासाठी मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने काम करावे जेणे करून पालक आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळा वगळता इतर महागड्या शाळेत पाठवणार नाही आणि (Zilla Parishad school) जिल्हा परिषद शाळेच्या पटसंख्या वाढीस मोठी मदत होईल. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी कर्तव्यास कसून केल्याचे आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, असे चिखली गट शिक्षण अधिकारी आर. आर. पाटील यांनी दै देशोन्नती शी सांगण्यात आले.