शिक्षण विभागाचा कारभार चर्चेत
सालेकसा/ गोंदिया (Zilla Parishad) : सालेकसा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शाळांमध्ये शिक्षकां अभावी शिक्षण कार्य पूर्णतः खोळंबले आहे. तरीसुद्धा गोंदिया जिल्हा परिषदेकडून सालेकसा तालुक्याला नवीन शिक्षक देण्यात दुर्लक्ष करण्यात येत आहे. कारण की नुकतेच गोंदिया जिल्ह्यात (Teacher Bharti) नवीन शिक्षक रुजू झाले असून सालेकसा तालुक्याला एकूण १०१ शिक्षकांचे पद रिक्त असताना फक्त १७ नवीन शिक्षक देण्यात आले आहेत .आणि तब्बल ८४ शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे जर या शिक्षकांची पूर्तता झाली नाही तर खोळंबलेली शिक्षण व्यवस्था (Education Department) आणखी ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सालेकसा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) एकूण ११२ शाळा आहेत. एकूण दहा केंद्रांच्या विचार केला तर बीजेपार केंद्रात २८ पद मंजूर असून फक्त २१ शिक्षक कार्यरत आहेत आणि सात पद रिक्त आहेत. दरेकसा केंद्रात ३४ शिक्षकांचे पद मंजूर असून २५ शिक्षक आहेत आणि नऊ पदे रिक्त आहेत. झालिया केंद्रात एकूण ४६ शिक्षकांचे पद मंजूर असून ३९ शिक्षक कार्यरत आहेत तर सात पदे रिक्त आहेत.कोटरा केंद्रात २९ शिक्षकांचे पद मंजूर असून २१ शिक्षक कार्यरत (Teacher Bharti) आहेत आणि आठ पद रीक्त आहेत. रामाटोला केंद्रात ४२ शिक्षकांची पद मंजूर असून फक्त २८ शिक्षक कार्यरत आहेत तर १४ पद रिक्त पडलेली आहे. रोंढा केंद्रात ४० पदे मंजूर असून ३२ शिक्षक कार्यरत आहेत आणि आठ पदे रिक्त आहेत. साखरीटोला केंद्रात २४ शिक्षकांचे पद मंजूर आहेत आणि २१ शिक्षक कार्यरत आहेत तीन पदे रिक्त आहेत.
सालेकसा केंद्रात ४३ पदे मंजूर असून ३७ शिक्षक कार्यरत आहेत आणि सहा पदे रिक्त आहेत .सोनपुरी केंद्रात ५६ शिक्षकांचे पद मंजूर असून ४४ शिक्षक कार्यरत आहेत आणि बारा पदे रिक्त आहेत. आणि तिरखेडी केंद्रात ३०शिक्षकांचे पद मंजूर असून २० शिक्षक कार्यरत आहेत आणि दहा पदे रिक्त आहेत असे सालेकसा तालुक्यात एकूण दहा शैक्षणिक केंद्रामध्ये ३७२ शिक्षकांचे पद मंजूर असून फक्त २८८ शिक्षक कार्यरत आहेत तर तब्बल ८४ पद रिक्त आहेत. त्यामुळे सालेकसा तालुक्यात गोरगरीब आदिवासी मागासलेल्या दलित पीडित पालकांच्या पाल्यांना हक्काचे शिक्षण मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे (Zilla Parishad) जिल्हा परिषदेचे अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
नवीन शिक्षकांची सालेकसाकडे पाठ
१०१ शिक्षकांची गरज असताना फक्त १७ शिक्षक मिळाले आहेत याची मुख्य कारण म्हणजे सालेकसा तालुका हा नक्षलग्रस्त अतिदुर्ग भाग असलेला तालुका असून या तालुक्यात कोणीही कर्मचारी स्वखुशीने रुजू होण्यास तयार नसतो. (Teacher Bharti) शिक्षकांच्या बाबतीत तसेच घडत असून नवीन आलेल्या शिक्षकांनी सोयीच्या ठरणार्या गोंदिया तालुका तिरोडा तालुका आणि इतर सोयीस्कर तालुक्यांना प्रथम पसंती देऊन त्या तालुक्यात रुजू झाले आहेत. परंतु सालेकसा कडे पाठ फिरवली आहे. अशात (Education Department) शिक्षणाधिकार्यांनी सालेकसा तालुक्याच्याही गांभीर्याने विचार करून नवीन शिक्षकांना सालेकशा तालुक्यात पाठवून त्यांना रुजू होण्यास भाग पाडले पाहिजे.
आठ शाळेत ५६ वर्ग शिक्षक मात्र १८
सालेकसा तालुक्यात अनेक शाळा असे आहेत की त्या ठिकाणी एक ते सात वर्ग असून सुद्धा एकच शिक्षक दोनच शिक्षक किंवा (Teacher Bharti) तीन शिक्षक कार्यरत आहेत त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक वर्गाला अध्यापन करणे तर दूरच राहिले त्यांना सांभाळणे ही कठीण होत आहे . तालुक्यात निंबा,गल्लाटोला, बाम्हणी आणि पाऊडदौना या चार शाळा अशा आहेत. त्या ठिकाणी एक ते सात पर्यंत फक्त दोन दोन शिक्षक कार्यरत आहेत. (Zilla Parishad) हल्बीटोला रामाटोला आणि बाकलसर्रा या ठिकाणी एक ते सात पर्यंत फक्त तीन तीन शिक्षक कार्यरत (Education Department) आहे. पांढरी येथे एक शाळा अशी आहे त्या ठिकाणी एक ते सातवी पर्यंत वर्ग असून सुद्धा एकच शिक्षक कार्यरत आहेत. तालुक्यात अशा एकूण आठ शाळा असे आहेत की त्यांचे एकंदरीत ५६ वर्ग आहेत मात्र त्यामागे फक्त १८ शिक्षक कार्यरत आहेत. सुकाटोला प्राथमिक शाळा अशी आहे की त्या शाळेत आज घडीला एकही शिक्षक कार्यरत नाही आणि उधारीच्या शिक्षकावर चालत आहे. अनेक वेळा शाळा बंद पडली दिसते.